Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शिक्षणाचा 'लातूर पॅटर्न'..नशा,यौन शोशन,अपहरण,जबरन वसुली च्या गर्देत..

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
शिक्षणाचा 'लातूर पॅटर्न'..नशा,यौन शोशन,अपहरण,जबरन वसुली च्या गर्देत..
अशा बाजारात..तेरी भी चुप,मेरी भी चुप'



दहावी व बारावीच्या निकालासोबतच नीट, सीईटी परीक्षांच्या धर्तीवर राज्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शैक्षणिक पॅटर्नची व साधारणतः दशकापूर्वी खाजगी क्लासेसचा पॅटर्न निर्माण झाला. तो रुजला व अल्पावधित 'हा वेलु गगनावरी...' जाऊन भिडला. हा व्यवसाय इतका बहरला की, ज्ञानदानासारख्या पवित्र क्षेत्राचा आधी व्यवसाय आणि अल्पावधीत धंदा झाला. त्याचसोबत या क्षेत्रात नशा,यौन शोशन,अपहरण,जबरन वसुलीसारखे गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगार कधी घुसले याचा सुज्ञ सुजाण लातूरकरांना अंदाजही आला नाही.याला थांबवण्यासाठी लातूर मधील काही राजकारणी,विविध संघटना, पत्रकार,पोलिस यांनी थोडाही प्रयत्न केला नाही उलट क्लासेसवाल्यांकडून कोणत्यानाकोणत्या कारणाने त्यांची अर्थीक पिळवणुक करण्यात आली,परंतू पिळवणुक होणारा या मध्ये कोठेतरी अडकला असल्यामुळे तेरी भी चुप,मेरी भी चूप,असा प्रकार झाला आहे.
 शिक्षणाचा पॅटर्न ? कसा बदलत गेला..
लातूर पॅटर्नची पैसे मोजून प्रसिद्धी केली जाण्यापूर्वी गरीब व गुणवंत विद्याथ्र्यांबाबत आस्था, सेवा व समर्पण भावातून विशिष्ट विषयांचे खाजगी मार्गदर्शन वर्ग चालायचे. सुरुवातीला सगळे कसे छान सुरु होते. खाजगी क्लासेस शिक्षणाचेच काम करीत होत्या व शिकवणारे शिक्षक हे सेवानिवृत्त किंवा गुणावत्ताधारक सुशिक्षित बेरोजगार स्थानिक तरुण होते. क्लासेसच्या शुल्कासाठी कसलीही आडकाठी वा अडवणूक नसायची. अनेक विद्यार्थी मोफत शिकत असत. या व्यवसायात काही चाणाक्ष लोक उतरले.
पैशाच्या जोरावर शिक्षणाचा काडीमात्र संबंध व गंध नसलेला वर्ग क्लासेसकडे वळला आणि त्यातून सुरु झाली ती जीवघेणी स्पर्धा. शिक्षणासारख्या ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात बाह्यघटक घुसल्याने मनी आणि मसल पॉवरच्या माध्यमातून परस्सरांवर कुरघोडी केली जाऊ लागली. बाहेरील राज्यातून उच्चशिक्षित बेरोजगार शिक्षक आणून त्यांना करोड़ो रुपयाचे पॅकेज देऊन राबवले जाऊ लागले. जिकडे अधिक विद्यार्थी ते क्लासेस उत्तम दर्जाचे असा समज व प्रसिद्धी झाल्याने या क्षेत्रात स्पर्धा वाढली. या जीवघेण्या स्पर्धेतून लातूर पॅटर्नने वेगळे वळण घेतले.पैशाचा तुफान खेळ, व्यावसायिक स्पर्धा व आकसाच्या परिणामातून अविनाश चव्हाण यांचा खुन करण्यात आल्याने लातूर शहर हादरले. या एकमेव घटनेने लातूर पॅटर्न व पवित्र शिक्षण क्षेत्रास काळिमा फासला गेला.
मुळात मयत अविनाश चव्हाणचा पिंड शिक्षणाचा नव्हताच. तो स्वतः नाममात्र शिकलेला होता. कॉलेजचे तोंडही त्याने कधी पाहिलेले नव्हते पण त्याने या व्यवसायाचा बारकाईने अभ्यास केला. अर्थकारण ओळखले. कसलेही श्रम न घेता कमी गुंतवणूक व अधिक नफा कसा मिळवावा याचे सूत्र त्याला सापडले होते. परिणामी त्याला अवघ्या तीन वर्षात करोडो रूपये मिळाले जे त्याच्याच जिवावर बेतले. त्याचा एकेकाळच्या व्यावसायिक भागीदार व मित्रानेच त्याचा 'गेम' केला असल्याचे उघड बोलले जावू लागले.. या खुनाने खाजगी शिकवण्याचे बाजारीकरण, त्याला आलेले धंदेवाईक स्वरूप, व्यावसायिक संघर्ष, गुंडगिरी, पक्ष संघटना व राजकीय हस्तक्षेप, मनी अँड मसल पॉवरची काळी बाजू प्रकर्षाने उजेडात आली.लातूरसारख्या एका छोट्या शहरात अब्जावधी रूपयांची वार्षिक उलाढाल होत असेल तर का नाही या व्यवसायाची भुरळ पडणार? कोणत्याही अनैतिक आणि बदनाम धंद्यापेक्षा या व्यवसायात प्रचंड पैसा आणि सोबत सुरक्षितता, प्रसिद्धी, ग्लॅमर, समाजसेवक म्हणून मान्यता मिळवून देणान्या खाजगी शिकवणी व्यवसायाच्या प्रेमात सगळेच पडले.
पुढे या मध्ये स्थानिक संघटना व गल्लीत गुंडगीरी करणाऱ्यांची मदत घेण्यास सुरुवात झाली. त्यातून पैशाचे प्रदर्शन आणि बर्चस्व गाजवण्याची स्पर्धा लागली. नेमकी ही बाब हेरुन शिकवणीच्या धंद्यात अपप्रवृत्तीचा शिरकाव झाला. त्यांच्याकडून ही व्यवस्था अक्षरशत्रू वर्गाकडे गेली व त्यांनी आपली वेगळी प्रतिमा बनवली. क्लासेसच्या
माध्यमातून खुळखुळू लागलेला पैसा इतर धंद्यासोबत देवधर्म, समाजकार्य, राजकारणात गुतवून 'मसीहा' बनण्याचा सोपा मार्ग अवलंबला. त्यातून वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्नही होता आणि मग हळूहळू परिस्थिती गेली. यात खरी गोची झाली ती काही सेवाभावी शिक्षकांची मनी व मसल पॉवरच्या जोरावर त्यांचा आवाज बंद केला गेला किंवा त्यांनाच आपल्या दावणीला बांधले गेले. मग बुद्धी आणि मनगटाच्या जोरावर व्यवस्था हवी तशी वाकवण्याची स्पर्धा वाढली.
अनेक क्लास संचालक भक्कम झाले. आपल्या आर्थिक साम्राज्याला कवचकुंडल मिळावे यासाठी त्यांनी राजकीय पाठबळ मिळवले. कुत्र्याच्या छत्रीसारख्या फोफावलेल्या संघटना व त्यांना छुपा पाठिंबा असलेले राजकारणी,काही पत्रकार,किबहुना पोलिसांनाही फंडिग करु लागले. राजकारणीही आर्थिक लाभ व वाढत्या पाठिंब्याने सुखावले. यातूनच लातूरातील अनेक संघटना या क्लास चालकाच्या पैशांतून निर्माण झाल्या. त्या संघटना संरक्षण पुरवू लागल्या. यातून अनेकवेळा क्लासेसच्या परिसरात दगडफेक, हाणामारी आणि गाड्यांची तोडफोड नित्यनियमाची झाली. 
हे होता होता २०२२ उजाडले परिस्थिति आजून गंभीर होत गेली.गुणवत्तेची खाण म्हणून ओळखला जाणारा हा पॅटर्न रक्तरंजित खेळाने चिंतेचा विषय झाला आहे.आतातर नशा,यौन शोशन,अपहरण,जबरन वसुली च्या गर्देत.. लातूर पॅटर्न पुतर्णत:विळख्यात अडकला आहे.मुलींना नशेच्या गोळया देवून त्यांचे यौन शोशन करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे, याची माहिती पोलिसांना मिळत नव्हती अशातला भाग नव्हता मात्र राजकीय हस्तक्षेप व पैशाच्या जोरावर असे प्रकरणे मिटवण्यात येत आहेत .गंभीर गुन्हे असलेले गुन्हेगार या मध्ये पुढाकार घेवू लागले.क्लासेस चालकाची हत्या, अपहरण,योन शोशन, खंडणीसाठी बांधून मारहाण अशा प्रकरणाने लातूर पुर्ण पणे हादरले.खाजगी शिकवणी वर्गाचे अर्थकारण, व्यावसायिक स्पर्धा व इतर काळ्या बाजू उजेडात आल्या. त्यानंतर आजपर्यंत डोळ्यावर कातडे ओढून झोपलेले लोक, शिक्षणप्रेमी जाणकार, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते आणि राज्यकर्ते यावर बोलू लागले.पण कोणताही व्यक्ती सुधारणा करण्यावर बोलत नव्हता ,तो फक्त झालेल्या घटनेवर बोलून आपली पोळी भाजून घेत होते ..आणि आजुनही घेत आहेत.

नेमके काय सुधारणा करणे अवश्यक आहे..?
"एक पत्रकार, संपादक व लातूरकर म्हणुन मला असे वाटते कि,शिकवणी क्लासेस असणे ही गरज असली तरी,एका क्लासमध्ये १००च्यावर विद्यार्थी असने चुकिचे असुन शिक्षण मंत्र्यांनी ज्या क्लासमध्ये १००च्यावर विद्यार्थी असतील त्या क्लासला शासनाच्या नियमामध्ये घेवून त्या क्लासला काॅलेज ची परवाणगी देण्यात यावी,जेनेकरून लातूर मधील विद्यार्थ्यांचे नाव संपुर्ण जगामध्ये झळकतील व विविध विषयाचे मार्गदर्शन आणि कोर्सेस तज्ञ प्राध्यपकाकडून शिकवले जातील.त्यामुळे फिस ही कमी प्रमाणात घेतली जाईल.असे झाले तर शिक्षणाचा बाजार थाबेल व आता सध्या चालू असलेले अवैध धंधे यावर लगाम लागेल यात काही शंका नाही."
Previous Post Next Post