Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर मध्ये राधिका ट्रॅव्हल्स प्रस्तुत 'युवा'दांडीयाची धूम..तृप्ती देसाई व डी गोविंदा यांची उपस्थिति

लातूर मध्ये राधिका ट्रॅव्हल्स प्रस्तुत 'युवा'दांडीयाची धूम
तृप्ती देसाई व डी गोविंदा  यांची उपस्थिति





गणेशोत्सव संपताच नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी गरबा, दांडियाचे पोस्टर लागले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मध्ये राधिका ट्रॅव्हल्स प्रस्तुत 'युवा' दांडीयाची क्रेज तरुण मुला-मुलींमध्ये वाढली असुन याचे मुख्य आकर्षण म्हणजे डी गोविंदा आणि बिग बॉस सीजन ३- तृप्ती देसाई या लातूर शहरात खास युवा दांडीया साठी लातूर मध्ये येत आहेत
त्यासोबतच प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, राधिका ट्रॅव्हल्स चे संचालक शाम तोष्णिवाल माझ लातूर परिवाराचे सतिशजी तांदळे व ईतर मान्यवर यांच्या उपस्थितित 
शनिवार दि.१आक्टोंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता दिवाणजी मंगल कर्यालय 
येथे होणार आहे.या दांडीया साठी विशेष आकर्षण डी गोविंदा आणि बिग बॉस सीजन ३- तृप्ती देसाई येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.तरी या राधिका ट्रॅव्हल्स प्रस्तुत 'युवा'दांडीया साठी सुप्रसिद्ध मराठी कलाकार व चला हवा येवू द्या फ्रेम भारत गणेशपुरे व बिग बॉस फ्रेम तृप्ती देसाई यांनी व्हिडिओ मार्फत लातूरकरांना येण्याचे आवाहन केले आहे.




या दांडीयाचे आयोजन दिपक जाधव,पियुष शास्त्री,अकाश सुर्यवंशी, योगेश ब्रिजवासी,उमेश धर्माधीकारी,यश अग्रवाल,प्रेमांशी जाॅयशर,यांनी केले असुन 
पासेस साठी खलील मो नंबर वर संपर्क करण्याचे अवाहन करण्यात आले आहे
राधिका ट्रॅव्हल्स,अशोक हाॅटेल,लातूर
मोनं-9284111185
        7666958485

"राधिका ट्रॅव्हल्स चे संचालक जुगोलकिशोर तोष्णिवाल यांनी मागील सहा वर्षापासुन राधिका ट्रॅव्हल्स च्या माध्यमातून जागतीक महिला दिना निमित्त महिलांना साडी वाटप,कोरोना काळात गोरगरिबांना अन्नधान्य वाटप,रस्ता सुरक्षा सप्तानिमित्त हेलमेट वाटप,हर घर तिरंगा अभियान अंतर्गत ५०००तिरंगा ध्वज वाटप,चालक दिना निमित्त सर्व चालकांचा सत्कार असे विविध सामाजिक उपकृम ते कायम राबवत असतात,असे दिलदार मनाने मोठे असलेले राधिका ट्रॅव्हल्स चे संचालक जुगोलकिशोर तोष्णिवाल यांनी या 'युवा' दांडीयासाठी विशेष मेहनत घेतली."

Previous Post Next Post