लातूरमध्ये बायोडिझेलचा काळाबाजार पुन्हा उघड..
दिवसाढवळया ट्रॅव्हल्स मधून येत आहेत रोज हजारो लीटर
लातूर पुन्हा एकदा लातूर शहरामध्ये बायोडिझेल चा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शहरांमध्ये बायोडिझेलच्या काळाबाजार आता उघड झाला आहे .गांधी चौक पोलिस स्टेशनच्या हद्दीत भर गांधी चौकांमध्ये सकाळी आठ वाजता मुंबईहून येणाऱ्या एका ट्रॅव्हल्स मधून तब्बल पंचवीस ते तीस केंट (40 लिटर) चे डिकीतून उतरवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे हे सर्व 40 लिटर कॅंड ट्रॅव्हल्सच्या डिकीतून रोज वाहतूक करत असून तेे, बारा नंबर पाटी पासून ते गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गांधी चौकात जागोजागी चार ते पाच कॅंड उतरवत असून त्यानंतर ते सर्व मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅव्हल्स मध्ये टाकण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती आता उघड होत आहे.यावर पोलिस प्रशासनाचे लक्ष आहे ,ना प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे लक्ष. हा गोरखधंदा दिवसाढवळ्या राजरोसपणे चालू असल्याचे चित्र दिसत आहे .मागील काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास अशीच एक ट्रॅव्हल्स गाडी बायोडिझेल सदृश्य वस्तू टाकताना थांबवण्यात आली होती परंतु त्यावर कसलीही कारवाई करण्यात आली
नाही. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना याबाबत ट्रॅव्हल्स मधून बायोडिझेल सदृश्य वस्तूचा राजरोसपणे ट्रॅव्हलच्या डिकीतून वाहतूक होत असून हे ट्रॅव्हल्स मालक नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे माहिती देण्यात आली होती परंतु त्यावर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.हकेच्या अंतरावर असलेल्या गांधी चौक पोलीस स्टेशन मात्र झोपेचे सोंग घेत आहे.एकीकडे नागरिकांकडून नियमाचे बोट उगारुन लाखोंरुपये दंड वसुल करत आहेत तर दुसरीकडे मात्र पोलिसांच्या बाजूलाच हा असा दिवसाढवळया काळा बाजार चालू आहे. आता राजरोसपणे या ट्रॅव्हल्स मधून रोज मुंबई-लातूर मार्गावर या गाड्यातून बायोडिझेल डिझेल सदृश्य तेलाची वाहतूक नागरिकांच्या जीवितास खेळ करत, वाहतूक करत आहेत .अशा या ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करण्यासाठी लाखोंरुपयाचे हप्ते ही देण्यात येत असल्याचे आता उघड बोलले जावू लागले आहे.यांच्या या हप्तेखोरीमुळे प्रवाशांचा जिव धोक्यात पडला असुन हजारो प्रवाशी जीव मुठीत घेवून प्रवास करत आहेत. लाखो रुपयांचा शासनाचा महसुलीही यामध्ये बुडताना दिसत आहे परंतु भ्रष्ट आणि लाचखोर अधिकार्यामुळे माझे कोणी वाकडे करत नाही याभावनेतून हे मालक मान-वर करून आपल्या ट्रॅव्हल्स मध्ये अशा प्रकारच्या ज्वलनशील वस्तूंची वाहतूक करत आहेत .पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी यावर आता गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करण्याची आवश्यकता बनली असल्याचे नागरिकाकडून सांगण्यात येत आहे