"उत्साहामध्ये या वाजत-गाजत या, शिस्तीने या कुठेही आपल्या तेजस्वी परंपरेला गाळबोट लागेल असे कृत्य करू नका', असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे."
महाराष्ट्रात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे.शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मागितलेली परवानगी मुंबई महानगरपालिकेने नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर सुधारित याचिका करण्याची ठाकरे यांच्या शिवसेना गटाची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली आहे.त्यामुळे मातोश्री वर एकचं जल्लोष करण्यात येत आहे.तर,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या वतीने ठाकरे गटाच्या याचिकेला विरोध करणारी मध्यस्थी याचिका केली आहे.अशातच मुंबई महानगरपालिकेची मोठी निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आमनेसामने आले आहेत.आता नेमके उद्धव ठाकरे या दसरा मेळाव्या मध्ये काय बोलनार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे