डॉक्टरांच्या निष्काळजी पणामुळे रुग्णाचा मृत्यु प्रकरणात-
डॉक्टर व संबंधीतांवर गुन्हा नोंद करुन हॉस्पीटलची मान्यता रद्द करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन
लातूर येथील शिवाजी चौक जवळील डॉ. प्रमोद घुगे यांचे आयकॉन हॉस्पीटल मध्ये संतोष दिनकर लातूरे (वय 35 वर्ष) हा रुग्ण् उपचारासाठी दाखल करण्यात आला होता.परंतू सदर रुग्णावर योग्य व वेळेवर उपचार न केल्यामुळेदि. 09/09/2022 रोजी तो मयत झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असुन यावर नातेवाईकांनी रुग्णालयाजवळ गर्दी केली होती.रुग्णालयावर आणि डॉ क्टर वर कार्यावाही करण्यासाठी नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशन मध्ये अर्ज दिला परंतू आजुन पर्यंत काहिही कार्यवाही न झाल्या मुळे दि १२सप्टेंबर रोजी मयत पेशंटच्या नातेवाईक आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून कार्यवाही करण्यासाठी मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,. सदर रुग्णावर होस्पीटलमध्ये डॉक्टर व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे व वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे या प्रकरणी डॉक्टर प्रमोद घुगे व हॉस्पीटल मधील कर्मचारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून सदर रुग्णाच्या नातेवाईकांना न्याय द्यावा तसेच आयकॉन हॉस्पीटलमध्ये नसिंग होम अॅक्ट या नियमाप्रमाणे कार्यवाही करावी. अग्निशमन वाहनच हॉस्पीटल च्या नियमाप्रमाणे नाही, तसेच मेडीकल सुविधा 24 तास पुरविल्या जात नाहीत त्यामुळे मेडीकल ची मान्यता रद्द करण्यात यावी
तसेच आयकॉन हॉस्पीटलचे डॉ. प्रमोद घुगे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात यावी, असे नाही झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी सोबत रमन शिवहार लातुरे, जगन्नाथ कोळंब, विपीन ढगे देवानंद गुजर - Dev, धर्मराज वाघमारे, कबीर शेख,बसवेश्वर रेकुळगे , सौरभ कदम,स्वप्निल कोरे ,अक्षय भताने, हर्षद ढगे, विष्णु कुंभारे जवले हे उपस्थित होते.