Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

नांदेड जिल्ह्यात....पोहोचला 'माझं लातूर' परिवाराचा उपक्रम

नांदेड जिल्ह्यात....पोहोचला 'माझं लातूर' परिवाराचा उपक्रम  
कंधार तालुक्यातील कुरुळा जिल्हा परिषद शाळेला दिली संविधान उद्देशिका भेट





लातूर:- शिक्षक दिनाचे औचित्य साधून माझं लातूर परिवाराच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी जळकोट आणि निलंगा तालुक्यातील शाळांना संविधान उद्देशिका भेट देऊन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

माझं लातूर परिवाराच्या या शैक्षणिक उपक्रमाची माहिती मिळताच लातूर - नांदेड सीमेवर असलेल्या कंधार तालुक्यातील कुरुळा येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी संविधान उद्देशिकेची मागणी काशिनाथअप्पा बळवंते यांच्याकडे केली. क्षणाचाही विलंब न करता संविधान उद्देशिका कूरुळा येथील शाळेत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.
शाळेतील दर्शनी भागात ही उद्देशिका लावण्यात आली आहे. उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत कांदे, सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय थोटे यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
Previous Post Next Post