लातूर / प्रतिनिधी- लातूर मध्ये गुरूवार दि २२ सप्टेंबर रोजी बॉईज ३’ चे प्रमोशनसाठी पत्रकार परिषद घेण्यात आली.बॉईज हा एक ब्रँड असून या ब्रँडने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मबॉईज ३फनेही अल्पावधीतच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. केवळ तीन दिवसांतच ‘बॉईज ३’ ने एक नाही, दोन नाही तर तब्बल ३.०५ करोडचा लक्षणीय गल्ला जमवला खरा परंतू कलाकारांच्या चेहर्यावरचा आनंद उडाल्याचे चित्र दिसत होते.त्यापैकी हिरोईन नविन असल्यामुळे नरवस दिसत असली तरी अनुभव असलेला पार्थ भालेराव मात्र कुठल्या तरी वेगळया विश्वात असल्याचे दिसत होते.पार्थ भालेराव याने बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सोबत हिंदी सिनेमा मध्ये काम केले आहे.तो अतिशय हुशार आणी जुना कलाकार आहे.हिदी सिनेमा मध्ये आपणास वाव मिळत नव्हता का..?असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थीत केल्यानंतर तो म्हणाला की,मला बर्याच वेळेस स्लम मुलाची भुमिका करण्यासाठी मागणी होत होती,परंतू मला एकाच भुमिकेत अडकून राहिचे नसल्यामुळे मी ते नाकारले असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.हा चित्रपट पुर्णत: व्यवसायिक स्वरूपाचा असुन तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची खात्री असल्याचेही त्यांनी सांगीतले.
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड, ओंकार भोजने आणि विदुला चौगुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.