भाजपा जिल्हयात सेवा पंधरवाडा नाविन्यपुर्ण करणार
लातूर दि.१२- जगातील लोकप्रिय नेते देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिना निमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत भाजपाच्या वतीने सेवा पंधरवाडा लातूर जिल्हयात सेवा भावनेतून नाविन्यपुर्ण विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जाणार असून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचे मराठवाडा विभागाचे संयोजक किशोर शितोळे आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होऊन विविध कार्यक्रमाची जबाबदारी अनेकांना देण्यात आली.
अंत्योदयाचा संकल्प देत देशातील गोर गरीब शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरीता देशसेवेचे ध्येय साध्य करत विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोंहचविण्यासाठी समर्पीत भावनेने कार्य करणारे देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिना निमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत भाजपाच्या वतीने देशभर सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत असून लातूर जिल्हयात हा पंधरवाडा नाविन्यपुर्ण व्हावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मराठवाडा विभागाचे संयोजक किशोर शितोळे यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड हे होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, विक्रमकाका शिंदे, शिवाजीराव केंद्रे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, प्रा. विजय क्षिरसागर, सेवा पंधारवाडा जिल्हा संयोजक वसंत करमुडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
देशात शिस्तबध्द काम करणारा एकमेव भाजपा पक्ष असल्याने पदोपदी पक्षाला देशभर यश मिळत असल्याचे सांगून किशोर शितोळे म्हणाले की, सेवा भावनेतून विविध कार्यक्रम यशस्वी झाल्यास पक्षाची प्रतिमा चांगली होऊन समाजाशी जोडली जाईल आणि सर्वत्र भाजपामय वातावरण होईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्काची कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे. सेवा सप्ताहात उत्कृष्ट काम करणाऱ्या देशभरातील दहा जिल्हयांची निवड होणार आहे. त्यात लातूर जिल्हयाचा समावेश रहावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, पक्षाकडून आलेले सर्व कार्यक्रम आजपर्यंत कार्यकर्त्यांनी अतिशय प्रभावीपणे राबविले. त्याचपध्दतीने किंबहुना त्याहून अधिक सेवा भावनेतून जिल्हाभरातील गावागावातील ग्रामदैवतांना अभिषेक करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावी. आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपन, चर्चासत्र यासह सेवा पंधरवाड्यात पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम नाविन्यपुर्ण प्रभावीपणे यशस्वी करावेत असे आवाहन केले.
सेवा सप्ताह यशस्वी करण्यासाठी लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने यावेळी अनेकांवर जबाबदाऱ्या दिल्या त्यात जिल्हा संयोजक वसंत करमुडे, सहसंयोजक सुनिल उटगे, यांची नियुक्ती करण्यात आली तर वृत्तपत्र लेख-चंद्रकांत कातळे, प्रदर्शनी- तुकाराम गोरे, मोदी@20 बुक चे स्टॉल- शंकर रोडगे, पोस्ट कार्ड- अमोल निडवदे, रक्तदान शिबीर- ज्ञानेश्वर चेवले, आरोग्य शिबीर व कोविड लसिकरण- बालाजी गुट्टे, दिव्यांग व वयोश्री-पंडीत सुकणीकर, बुध्दीजीवी संमेलन- विजय क्षीरसागर, एक भारत श्रेष्ठ भारत एकता मेळावा – रामलिंग शेरे, आत्मनिर्भर भारत- सौ. उत्तरा कलबुर्गे, स्वच्छता अभियान- सुरेंद्र गोडभरले, प्लास्टीक मुक्ती जनजागृती- तानाजी बिराजदार, जल ही जीवन- रोहीदास वाघमारे, वृक्षारोपन- बापुराव राठोड, मोदीजींच्या कार्याचे होर्डीग- बबलू पठाण, सोशल मिडीया- महेश गाडे, स्वदेशी खादी खरेदी- पंडीत सुर्यवंशी याप्रमाणे जबाबदारी देण्यात आली आहे.
या बैठकीत सेवा पंधरवाड यशस्वी व्हावा यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या सुरूवातीस जिल्हा भाजपाच्या वतीने सेवा पंधरवाडा मराठवाडा विभाग संयोजक किशोर शितोळे यांचा आ. रमेशअप्पा कराड यांनी सत्कार करून त्यांचे स्वागत केले. बैठकीस भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.