गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
रोडवर कत्तीने केक कापून केला वाढदिवस साजरा
बर्थडे बॉय सह 6 जनाविरुद्ध गुन्हा दाखल.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, काही तरुणांनी बर्थडेचा कत्तीने केक कापतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा व्हिडिओ पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली चालणाऱ्या सोशल मीडिया वॉचर टीमच्या निदर्शनास आले. पुढील कायदेशीर कारवाई करीता सदरची माहिती पोलीस ठाणे विवेकानंद चौक यांना देण्यात आली होती.त्यावरून विवेकानंद चौक पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.या प्रकरणी शस्त्रबंदी कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
वाढदिवसा निमित्ताने बसवेश्वर चौक ते नांदेडनाका कडे जाणाऱ्या रिंग रोडवर सार्वजनिक ठिकाणी कत्तीने केक कापून जल्लोष केल्याबद्दल पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची कारवाई केली. हा प्रकार 02/09/2022 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास रिंग रोडवर घडला.वाढदिवस साजरा करण्यासाठी हे तरुण रात्री 8 वाजण्याच्या सुमारास रिंग रोडवर एकत्र आले; पण वाढदिवसाचा केक कापण्यासाठी त्यांनी कत्तीचा वापर केला.
सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या जमाबंदी व शस्त्रबंदीचे आदेश असतानाही सदर आदेशाचे उल्लंघन करून तसेच धारदार शस्त्र जवळ बाळगून भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांच्या विविध कलमांचे उल्लंघन करून अपराध केल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे निर्देशानुसार वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक श्री.सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील पोलीस पथकाने आरोपी नामे
1) ऋतीक सुरेश हुलगुंडे वय 18,वर्ष राहणार सम्राट चौक, लातूर
2) वाजिद चांद सय्यद ,वय 20वर्ष, राहणार इस्लामपुरा, लातूर
3) संविधान ब्रह्मदेव धावारे, वय 18 वर्ष, राहणार राहुल नगर, लातूर.
4) समयंक शिवराज कांबळे,वय 19 वर्ष, राहणार इस्लामपुरा, लातूर.
5) अमन मुजाहिद दख्खने, वय 19 वर्ष, राहणार इस्लामपुरा, लातूर
6)गोपाळ मदने, वय 19 वर्ष, राहणार श्रीकृष्ण, लातूर.
यांचे विरुद्ध पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 539/ 2022 कलम 188 भादवी तसेच 135 मपोका, कलम 4 व 25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून लोखंडी कत्ती जप्त करण्यात आली असून त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे ,बालाजी गोणारकर ,ज्ञानोबा देवकते ,सहाय्यक फौजदार रामचंद्र ढगे, पोलीस अमलदार विलास फुलारी, महेश पारडे, खंडू कलकत्ते, राम सोनहिवरे, नारायण शिंदे, अशोक नलवाड यांनी केली आहे.