सुरक्षित प्रवासासाठी चालकांनी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सुदृढ असने आवश्यक- शितल गोसावी

बस वाहतूक चालकांचा माझं लातूर परिवाराच्या वतीने सत्कार*
लातूर:- रस्ता सुरक्षा अभियानात चालकांची जबाबदारी मोठी असून सुरक्षित प्रवासासाठी वाहन चालकांनी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सुदृढ असणे गरजेचे असल्याचे मत लातूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षक शितल गोसावी यांनी व्यक्त केले.
माझं लातूर परिवार आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बस वाहतूक वाहन चालकांच्या सत्कार सोहळ्यात चालकांना मार्गदर्शन करताना शितल गोसावी बोलत होत्या. याप्रसंगी शहर वाहतूक पोलिस शाखेचे उपनिरीक्षक आवेज काझी, मोटार वाहन उप निरीक्षक मामडे, ट्रॅव्हल्स असोसिएशनचे सुनील देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रादेशिक परिवहन विभाग आणि माझं लातूर परिवाराच्या वतीने जनजागृतीसाठी आयोजित कार्यक्रमात खाजगी बस वाहतूक करणाऱ्या चालकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शहर वाहतूक पोलिस शाखेचे उपनिरीक्षक आवेज काझी यांनीही उपस्थित चालकांना वाहतूक नियमांचे पालन केल्यास होणारे अपघात टळू शकतात असा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ मेदगे यांनी तर आभार जुगलकिशोर तोष्णीवाल यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझं लातूर परिवाराचे शाम तोष्णीवाल, विष्णू आष्टीकर, वेंकट माने, कराड मामा यांनी परिश्रम घेतले.
