सोशल मिडीयावरील पोस्ट संभ्रमा बाबत ..
'आयआयबी' ने दिला जाहीर प्रगटनात खुलासा
लातूर / प्रतिनिधी : दरवर्षी प्रमाणे नीट - २०२२ मध्ये आयआयबीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत कष्टाने, मेहनतीने आणि जिद्दीने परीक्षेला सामोरे जात या परीक्षेत यश मिळवले आहे. याचा आयआयबी टीमला सार्थ अभिमान आहे. नीट २०२२ निकालावरुन सोशल मिडीयावर ज्या संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट जाणीवपूर्वक व्हायरल केल्या जात असून विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रम निर्माण केल्या जात आहे. त्यासंदर्भात
IIBआयआयबी मॅनेजमेंट हे जाहीर प्रगटन दिले आहे.
आयआयबीच्या नांदेड, लातूर आणि पुणे ( पिंपरी) येथे शाखा असून या शाखांमधून इयत्ता ११ वी, १२ वी, रिपीटर, टेस्ट सिरिज, क्रॅश कोर्स सह इत्यादी कोर्सेस नीट ( राष्ट्रीय पात्रता पूर्व परीक्षा ) च्या तयारीसाठी घेतले जातात. परिक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी किती क्लास लावावेत हा त्याचा वैयक्तिक अधिकार असून त्यावर कोणीही आहे.
बंधने घालू शकत नाही. त्यामुळे काही विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा अधिक क्लासेसमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या शिकवणी अथवा टेस्ट सिरीजसाठी असू शकतात. त्यामुळे नीट २०२२ निकालाच्या बाबतीत एकच विद्यार्थी वेगवेगळ्या क्लाससेच्या जाहीरातीमधून दिसण्यावरुन जो संभ्रम निर्माण केला जात आहे तो दूर करुन त्याची सत्यता पडताळावी असे आयआयबीने कळविले