Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शेतकर्यांना सरसकट पिकविमा,अनुदान मंजूर करा अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू..

शेतकर्यांना सरसकट पिकविमा,अनुदान मंजूर करा अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू..




शेतकर्यांना
सरसकट पिकविमा,अनुदान मंजूर करा अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू.. असा मनसे सरचिटणीस तथा मनसे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे यांनी इशारा दिला आहे

     रेणापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी सततचा पाऊस,शंकी गोगलगाय व हळदी रोग या सर्व रोगांमुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असल्यामुळे शासनाचे मिळणारे अनुदान व विमा रेणापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान,नुकसान भरपाई व पिक विमा मिळण्यासाठी तहसील कार्यालय,रेणापूरच्या समोर संतोषभाऊ नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

  चालू वर्षी खरिपाची पेरणी रेनापुर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन या पिकाची पेरणी झालेली होती व याच काळामध्ये सतत झालेल्या पावसामुळे व शंकी गोगलगायीमुळे शेतकऱ्यांना दुभारती बात पेरणीचे संकट आलेले होते. त्यामुळे रेनापुर तालुक्यातील सर्व शेतकरी हातबल झालेले दिसून येत होते. बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या शेतातील सोयाबीन पीक मोडून टाकण्याची वेळ आलेली होती त्यामुळे रेनापुर तालुक्यातील सर्व शेतकरी हे शासनाच्या अनुदानाकडे व प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ मिळण्याकडे मोठ्या आशेने पाहत होते त्यात काही शेतकऱ्यांचे कसेबसे सोयाबीन हे पीक आले होते त्यात हळद्या रोगाचा प्रादुर्भाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसून आला व त्यामुळे राहिले असले सर्व शेतकऱ्यांचे पीक हे हातातून निघून गेले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून रेनापुर तालुक्यातील शेतकऱ्यांवर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे नैसर्गिक संकट वारंवार येत आहे, परंतु दरवर्षी रेनापुर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कुठल्याही अनुदानाची किंवा प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ मिळालेला नाही व सदर योजनेतून रेनापुर तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलेले आहे.

   त्यामुळे रेनापुर तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग चालू वर्षांमध्ये मेटाकोटीला येऊन शासनाच्या अनुदानाकडे व प्रधानमंत्री पिक विमा कडे मोठे आशेने पाहत होता, यावर्षी रेनापुर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे अतिवृष्टी सततचा पाऊस शंके गोगलगाय व हळद्या रोग या सर्व रोगामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असल्यामुळे व काही दिवसापूर्वी शासनाने जे बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले आहे व माननीय जिल्हाधिकारी यांनी विम्याच्या 25% रक्कम द्यावी असे आदेश देण्यात आलेले आहेत परंतु हे सर्व अनुदान व विमा रेणापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना न मिळता तालुक्यातील फक्त तीनच महसूल मंडळाला लागू करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

  रेनापुर तालुक्यात मध्ये शंकी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून तालुक्यातील फक्त 2500 हेक्टर एवढेच शेतकरी बाधित ठरले असून त्यांना मिळणारी रक्कम ही तीन कोटी रुपये एवढी आली आहे, त्याचबरोबर रेनापुर तालुक्यातील एकूण पाच महसूल मंडळी असून त्यापैकी फक्त तीनच रेणापूर पोरेगाव पळशी याच मंडळांना सरासरी उत्पन्न पेक्षा कमी उत्पन्न दाखवून जिल्हाधिकारी साहेबांनी 25% अग्रीम विमा रक्कम देण्याचे आदेशित केले आहे, तसेच तालुक्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे ते 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले 170 हे.अर्थात 275 शेतकरी एवढेचे दाखवली असून अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले बाधित क्षेत्र 16581 हे.अर्थात 25165 शेतकरी अशा प्रकारचे नुकसान प्रशासनाने दाखवले आहे व तालुक्यात मोठ्या प्रमाणात हळद्या रोग याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेले असून सुद्धा तालुका प्रशासनाने तालुक्यातील बाधित क्षेत्र व शेतकरी हे 0 दाखवले आहे. या सर्व गोष्टीचा विचार केला तर सरासर पूर्ण शेतकऱ्यांची तालुका प्रशासनाने फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.त्याचबरोबर ज्याअर्थी जिल्हाधिकारी साहेब यांनी तालुक्यातील तीन मंडळांना 25 टक्के अग्री विमा देण्याचे जाहीर केले आहे त्याअर्थी या तीन मंडळातील सर्वच शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान झालेले आहे असे जिल्हाधिकारी साहेब यांच्या चौकशी आणखी समोर आले आहे,त्यामुळे त्या तिन्ही मंडळातील सर्व शेतकऱ्यांना व तालुक्यातील इतरही मंडळातील सर्वच शेतकऱ्यांना जो निधी आलेला आहे तो सरसकट वाटप करण्यात यावा जेणेकरून तालुक्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.

तसेच काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये 2 लाख 13 हजार हेक्टर क्षेत्र बाधित करण्यात आलेले आहे त्यामध्ये रेनापुर तालुक्याचा प्रामुख्याने उल्लेख करून तालुक्यातील प्रशासनाने जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करावा व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा.

  त्यामुळे रेनापुर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांमध्ये शासनाविषयी मोठी चिड निर्माण झाली असून सर्व शेतकरी वर्ग शासनाच्या विरोधात कुठलाही पवित्रा घेण्यास तयार आहेत म्हणून आम्ही माननीय तहसीलदार मॅडम यांना या निवेदन निवेदनाद्वारे निवेदित करतो की शासनाने या घेतलेल्या आडमुठ्या निर्णयामुळे रेणापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आज दिनांक 30/09/2022 वार शुक्रवार रोजी सकाळी 11वाजता रेनापुर येथील तहसील कार्यालयासमोरील रोडवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करत आहोत परंतु या उपरही जर तालुका प्रशासनाने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून नाही दिला तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन अति तीव्र आंदोलन केले जाईल व या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचे शासकीय नुकसान झाले त्यास प्रशासन जबाबदार राहील.

   यावेळी उपस्थित शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष भागवत शिंदे,जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे,वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष वाहेद शेख,जिल्हा सचिव संतोष दाने तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुंडे,बापू कुलकर्णी,धाराशिव शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष शाहूराज माने,तालुका संघटक श्रीपाल बस्तापुरे, तालुका सचिव भागवत कांदे ज्ञानेश्वर जगदाळे,इमरान मणियार, सचिन इगे, नरसिंग भताने, प्रमोद आंबेकर राहुल चितळे सदाशिव आंबेकर अविनाश चित्ताडे नाथराव आंबेकर, सुरेश घोडके, शिवराज शिरसाठ राम शिरसाट पद्माकर घुले दीपक मुंडे भागवत मुंडे,बालाजी घुले,ऋषिकेश माने,प्रदीप माने,दशरत कराड सुरेश गालफाडे दौलत मुंडे,मच्छिंद्र केदार,प्रमोद कांदे वंदनाताई केंद्रे,बापू सोमवंशी संभाजी शिरसाट,धनराज शिरसाट महादेव शिरसाट



Previous Post Next Post