महिला पीएसआय पाच हजारांची लाचघेताना 'एसीबी'च्या जाळ्यात
: रेणापूर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस उप निरीक्षक रेणुका बालाजी जाधव (वय 31 वर्ष) यांनी दाखल गुन्ह्यामध्ये फिर्यादीच्या बाजुने तपास करुन मा. न्यायालयात पाठविण्यात आलेल्या दोषारोप पत्राचा मोबदला तसेच यानंतर दाखल गुन्ह्यातील आरोपी यांचे कडून संरक्षण देण्याकामी त्यांच्या राहते घरी बोलावून सुरुवातीस रु.7000 व तडजोडीअंती रु.5000 पंचासमक्ष लाचेची मागणी केली. यानंतर थोड्याच वेळात त्यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम रु.5000 रेणापुर बसस्थानक आवारात पंचाक्षमक्ष घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड परिक्षेत्राचे अप्पर पोलीस अधीक्षक धरमसिंह चव्हाण, लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक पंडित रजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनवर मुजावर यांच्या पथकाने केली असून आरोपी महिला पोलीस उपनिरीक्षक रेणुका जाधव यांना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.