मुख्यमंत्री साहेब... ब्राह्मण समाजासाठी महमंडळ केंव्हा स्थापन करणार..?
लातूर: गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाबाबत राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले.आणि त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आझाद मैदान गाठले. आंदोलकर्त्यांची भेट घेतली. गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात येणार,अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली त्याला कोणत्याच समाजाने विरोध केला नाही,अन् करण्याचे तसे कारणही नाही,परंतू ब्राम्हण समाजाच्या बेरोजगार तरुण मुलांसाठी महामंडळ व्हावे यासाठी आजपर्यंत कोणीही उठाव केला नाही,सध्या समाजाची अवस्था अत्यंत बिकट असून जे काही जगण्यासाठी चालू आहे ते फक्त त्यांच्याजवळ असलेल्या बुध्दीमत्येवर,परंतू मागील काही दशकांपासुन नौकरी म्हणजे हरणाच्या बेंबीतील'कस्तुरी'आहे.जवळ तर असते,परंतू भेटत नाही,अशी अवस्था यासमाजातील बहुतांश मुलांची झाली आहे.धंदा करण्यासाठी मुबलक पैसा नसल्या कारणांने बहुतांश मुलांनी आपली दुकाने बंद करुन मिळेल ते काम करत आहेत.परंतू याकडे मात्र कोणत्याही मुख्यमंत्र्यांचे लक्ष गेले नाही,किंबहुना ब्राह्मण समाजातील मुख्यमंत्र्यांना सुध्दा याकडे पहावे असे वाटले नाही,आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुचे कैवारी आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आता तरी ब्राह्मण समाजाच्या अशा झालेल्या हालातीवर तरस खातील का..?अशी तिव्र संतोष समाजातील तरुण वर्गातून निर्माण होत आहे.आत्तापर्यंत डझनभर ब्राम्हण समाजाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,आमदार,खासदार झाले परंतू या समाजातील तरुण वर्गाची झालेली हालत कोणालाही समजली नाही.आता हिंदुचे कैवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुन्हा ब्राह्मण समाजाचे उपमुख्यमंत्री यांनी या विषयावर गंभीरपणे विचार करुन लवकरात लवकर महमंडळ स्थापन करावे असे मत आता समाजातील तरुण मुले आणि जानकारांकडून व्यक्त होत आहे