गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
भाजपच्या एका बड्या नेत्याच्या फॉर्म हाऊसवरील धक्कादायक प्रकार
शिरूर तालुक्यात बारा वर्षीय मुलीवर बलात्कार;आरोपीला अटक
शिक्रापूर/ प्रतिनिधी पुणे
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जिल्ह्यातील भाजपच्या बड्या नेत्याच्या फार्म हाऊसवर बारा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये विशाल दामोदर गायकवाड या युवकावर गुन्हे दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
"या प्रकरणी भुमाता ब्रिगेड च्या तृप्ती देसाई यांनी हे प्रकरण गंभीर असून भाजपच्या नेत्याचा फार्म हाऊस असल्याने दाबण्याचा प्रकार होवू शकतो ,असे झाल्यास त्यामुलीला न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरु असे सांगीतले आहे"
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याचे फार्म हाऊस असून सदर ठिकाणी काही कुटुंबीय कामाला आहेत. पीडित युवतीचे आई-वडील देखील सदर फार्म हाऊसवर कामाला असून मुलीचे आई-वडील बाहेर गेलेले असताना विशाल गायकवाड या युवकाने पीडितेला बळजबरीने पकडून घरामागील बाजूस घेऊन जात तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. यावेळी विशाल गायकवाड याने बारा वर्षीय मुलीला तू जर घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले, तर तुझ्या आई- वडिलांना खल्लास करून टाकेल, अशी धमकी दिली. त्यामुळे मुलगी पूर्णतः भेदरली गेली, त्यांनतर भेदरलेल्या मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला, त्यानंतर तिचे वडील आल्यानंतर तिच्या आईने व मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला, त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले, घडलेला प्रकार पोलिसांना सांगत पीडित युवतीच्या आईने याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी विशाल दामोदर गायकवाड (वय २१, सध्या रा. भाजप नेता फार्म हाऊस, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. हळणी, ता. अहमदपूर, जि. लातूर) याच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचारसह बलात्काराचे गुन्हे दाखल करत त्याला तातडीने अटक केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे