गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
कुख्यात डॉन 'दाऊद इब्राहिम' वर २५ लाखांचे बक्षीस
मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचे साथीदार यांचे पत्ते सांगणाऱ्यास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बक्षिसे जाहीर केली आहेत. त्यानुसार दाऊदचा पत्ता सांगणाऱ्यास २५ लाख रुपये, तर त्याचा विश्वासू साथीदार छोटा शकील याचा पत्ता सांगणान्यास २० लाख रुपये तसेच
१९९३ मध्ये झालेल्या साखळी स्फोटातील मुख्य आरोपी टायगर मेमन, दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम व जावेद चिकना यांचा समावेश आहे. या तिघांवर प्रत्येकी १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
दाऊद टोळीच्या कारवायांना उद्ध्वस्त करण्यासाठी एनआयएने दाऊद टोळीशी संबंधित खंडणी वसुली, सेटलमेंट, ड्रग्ज तस्करी आणि हवाला रॅकेट यांतील आर्थिक व्यवहार आणि सिंडिकेटबाबत चौकशी करून
गुन्हा दाखल केला आहे. एनआयएच्या पथकांनी मुंबई आणि ठाण्यातील एकूण २९ ठिकाणी छापेमारी केली होती. त्यात काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली. त्या अनुषंगाने तपास करीत एनआयएने सलीम फ्रुटला अटक केली. सलीमने बांधकाम व्यावसायिकांना धमकावण्यासाठी आणि जागेचा मालकी हक्क मिळविण्यासाठी दाऊद टोळीतील छोटा शकीलच्या नावाचा वापर केल्याचा संशय आहे. एनआयएच्या तपासात सलीमने किमान दोन मालमत्तांबाबत दाऊद टोळीकडून धमकावल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच अनेक बांधकाम व्यावसायिकांना धमकावून कोट्यवधींची खंडणी छोटा शकील व दाऊदपर्यंत पोहोचल्याचा एनआयएला संशय आहे.
दाऊद भारतात शस्त्रे, स्फोटके, अमली पदार्थ आणि बनावट भारतीय नोटांची तस्करी करण्यामध्ये सक्रिय असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती; तसेच पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि काही दहशतवादी संघटनाही त्याला मदत करत असल्याची माहितीही उघड झाली होती. त्यानंतर आता हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारावर या सर्वावर बक्षीस जाहीर केले.