ट्रॅफिक मध्ये माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांची गाडी अडकल्यामुळे रस्त्यावरच आंदोलन
उदगीर(संगम पटवारी) शहरातल्या मुख्य रस्त्यावर वाहतुकीच्या समस्येमुळे रस्ता हा नेहमीच जाम होत असुन आज माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांची गाडी ट्राफीक मध्ये अडकली होती त्यामुळे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांनी प्रशासनाच्या विरोधात जय जवान चौकात ठिय्या आंदोलन केले मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणामुळे रस्ता रहदारीस अडचन निर्माण होत असुन प्रशासनाचे याकडे दूर्लेक्ष असुन रस्ता मोकळा करुन वाहतुकीची कोंडी सोडवावी तसेच सर्वसामान्यांची हेळसांड होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांनी म्हणटले मुख्य रस्त्यावरील अक्रमणामुळे रस्ता रहदारीची समस्या होत आहे यासाठीच मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी पञकारांच्या वतीने गेली 50 दिवस झाले छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन सूरु आहे.या कडे एकाही राजकीय नेत्यांचे लक्ष नाही. पण एका नेत्यांच्या गाडीला रस्ता मिळाला नाही म्हणून संपूर्ण उदगीर डोक्यावर घेण्याची गरज नव्हती.अशी भावना सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.