Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

श्री गणेश विसर्जना निमित्त लातूर शहरातील वाहतुक मार्गात बदल...

 
श्री गणेश विसर्जना निमित्त लातूर  शहरातील वाहतुक मार्गात बदल...




  उपरोक्‍त संदर्भीय विषयांकित प्रकरणी,लातूर शहरात दि.09/09/2022 रोजी श्री चे विसर्जन असल्‍याने शहरात विविध मंडळातर्फे श्री ची मिरवणुक काढण्‍यात येते,त्‍यामुळे जनतेच्‍या सोयीच्‍या व सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने लातूर शहरातील नागरीकांच्‍या दैनंदिन कामकाजासाठी दि.09.09.2022 रोजी खालील मार्गावरील वाहतुक बंद करणे अथवा पर्यायी मार्गावर वळविणे आवश्‍यक आहे.

 

दि. 09.09.2022 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 23.50 वाजेपर्यंत वाहतुकीस बंद राहणारे मार्ग 

1. पी.व्‍ही.आर.चौक ते दयानंद गेट, शिवाजी चौक, अशोक हॉटेल, गांधी चौक, हनुमान चौक,गंजगोलाई तसेच विवेकानंद चौक ते शाहु चौक, गंजगोलाई, सुभाष चौक, दयाराम रोडने खडक हनुमान, पटेल चौक, सिध्‍देश्‍वर मंदीर हा मार्ग दि. 09.09.2022 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 23.50 वाजेपर्यंत सर्व वाहनांना(मोटार सायकल, थ्री व्‍हीलर, एस.टी.बसेस, ट्रक टेम्‍पो, टॅक्‍सी, ट्रॅव्‍हल्स,मिनीडोअर इ.) वाहतुकीसाठी बंद राहील.

 

दि.09.09.2022 रोजी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

1) पी.व्‍ही.आर.चौकातून शिवाजी चौक व शहरात येणारे एस.टी.बसेस पी.व्‍ही.आर.चौकातून रिंग रोडने नविन रेणापुर नाका मार्गे जुना रेणापुर नाका येथील बस स्‍टॅन्‍डचा वापर करतील. उर्वरीत सर्व वाहने जुना रेल्‍वे लाईनच्‍या पॅरलल रोडचा वापर करतील.

2) औसा रोडने शहरात येणा-या एस.टी.बसेस या राजीव गांधी चौक मार्गेच शिवाजी चौक एस.टी.डेपोचा वापर करतील तसेच चारचाकी, तीन चाकी व दोन चाकी वाहने जुना औसा रोड एल.आय.सी.कॉलनी,नाईक चौक,सुतमिल रोड या मार्गाचा वापर करतील .

3) रेणापुर रोडने शहरात येणा-या एस.टी.बसेस जुना रेणापुर नाका येथील बससथानकाचाच वापर करतील. रेणापुर रोडने येणारी चार चाकी,तीन चाकी व दोन चाकी वाहने हि जुना रेणापुर नाका बालाजी मंदीर व खोरी गल्‍ली या मार्गाचा वापर करतील.

4) गंजगोलाई-सुभाष चौक-दयाराम रोड मार्गे खडक हनुमान-सिध्‍देश्‍वर मंदीर या मिरवणुक मार्गावर सर्व वाहनास सदरचा रोड वाहतुकीसाठी बंद करण्‍यात आला आहे.

5) नांदेड रोडने शहरात येणा-या एस.टी.बसेस या गरुड चौक,सिध्‍देश्‍वर चौक नविन रेणापुर नाका मार्गे जुना रेणापुर नाका येथील बसस्‍थानकाचा वापर करतील.

6) शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी 1)राजस्‍थान विद्यालय ते दयानंद गेट या पॅरलल रोड 2) गांधी चौक ते बस्‍वेश्‍वर महाविद्यालय-रमा चित्रपटगृह-खोरी गल्‍ली-शिवनेरी लॉज अशा मार्गाचाच अवलंब करावा. शिवाजी चौक एस.टी.डेपो व जुना रेणापुर नाका बसस्‍थानक येथे येणा-या जाणा-या सर्व बसेस परत त्‍याच मार्गानी रिंग रोडने जातील. 

  तरी सर्व नागरीकांनी दि.09.09.2022 सकाळी 10.00 ते 23.50 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करुन वाहतुकीसाठी बंद असलेल्‍या मार्गावर वाहनांचा वापर टाळून प्रशासनास सहकार्य करावे.
Previous Post Next Post