Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आ.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते गणेश मंडळाच्या श्री गणरायाची आरती

आ.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते काका आणि कै.गिरिश साळूंके  गणेश मंडळाच्या श्री गणरायाची आरती






 
लातूर प्रतिनिधी : ३ सप्टेंबर २०२२ :

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते आज शनिवार दि. 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी लातूर शहरातील प्रकाश नगर येथील काका गणेश मंडळाच्या व कै. गिरीष साळुंके सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री गणरायाची आरती करून त्यांनी सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच आमदार अमित देशमुख यांनी काका गणेश मंडळाच्या वतीने आयोजित केलेला महाप्रसाद ही ग्रहण केला.
888
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, काका गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत कातळे, काका गणेश मंडळ चे 2022 चे अध्यक्ष सतीश (पिंटू) साळुंखे, उपाध्यक्ष गोटू यादव, सचिव विशाल कामेगावकर, कै. गिरीश साळुंके सार्वजनिक गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंके, कै. गिरीश साळुंके सार्वजनिक गणेश मंडळ 2022 चे अध्यक्ष बिभीषण सांगवीकर, माजी नगरसेवक आयुब मनियार, गोटू यादव, पप्पू देशमुख,सचिन बंडापले, व्यंकटेश पुरी, संजय ओव्हाळ, महेश काळे, विश्वंभर प्रसाद, शर्मा महाराज, वृंदावन उत्तर प्रदेश नागसेन कामेगावकर, आनंद वैरागे, योजना कामेगावकर, पवन सोलंकर, सायरा पठाण, मंदाकिनी शिखरे, अकबर माडजे, प्रा.प्रवीण कांबळे, महेश शिंदे, मुन्ना शिंदे, भालचंद्र सोनकांबळे, पंडित कावळे, रमेश सूर्यवंशी आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी गणेश भक्त परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 यावेळी आमदार देशमुख म्हणाले की, या आरतीसाठी आलो याचा मला आनंद आहे गणरायाचे थाटामाटात आगमन सर्वत्र झाल आहे. मुंबई, पुणेचा गणेशोत्सव आपण ऐकून आहोत. आज लातूर प्रकाश नगरातील गणेश उत्सव कौतुकास्पद आहे, सूर्यकांत कातळे व सहकाऱ्यांचे मी कौतुक करून अभिनंदन करतो. त्यांनी लातूरच्या परंपरेला साजेसा उत्सव आयोजित केला गणेश स्थापना महापूजा महाउत्सव दिमाखाने सुरू आहे. मुंबई पुण्यासारखे गणेश उत्सव थाटामाटात लातूर साजरा होतोय. पुढे बोलताना ते म्हणाले की, गणरायाच्या आशीर्वादाने आम्ही व सहकारी सेवा करत आहोत, सार्वजनिक जीवनात काम करत आहोत. राजकारण समाजकारण हे काही पदरात पडेल म्हणून करत नाही. आपले आशीर्वाद प्रेम पाठबळ या जोरावरच सर्व संधी चालून येत असे आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच असावीत असे सांगून त्यांनी उपस्थित सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
Previous Post Next Post