टेम्पो लावण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी
ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल
उदगीर(संगम पटवारी) देगलूर रोडवर दोन गटात हाणामारी घटना 8 सप्टेंबर रोजी घडली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की देगलूर रोडवरील बालाजी टाईल्स गोडावूनच्या समोर अब्दुलगणी मैनोद्दीनसाब तांबोळी वय 35 वर्ष राहणार मुक्रमाबाद ता मुखेड जी नांदेड व विकास शिवाजी जाधव राहणार बोरतळा तांडा या दोघात टेम्पो बारीला लावण्याच्या कारणावरून वाद होवून तुंबळ हाणामारी झाली या हाणामारीत दगड,लोखंडी टॉमी व काठीचा वापर करण्यात आला या हाणामारीत दोघा गटातील व्यक्ती जखमी झाले आहेत दोन्ही गटातील व्यक्तीनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून परस्परविरोधी दोन्ही गटावर 9 सप्टेंबर रोज शुक्रवारी रात्री गुरंन 414/2022कलम 327,324,323,504,34 भादवी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक भोळ यांच्याकडे देण्यात आला आहे