लातूर (प्रतिनिधी) - बंसल क्लासेस महाराष्ट्र प्रदेश चे मुख्य प्रवर्तक तथा अध्यक्ष राजस्थानी। मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सो. सा. लि. परळी वैजनाथ मा. चंदुलालजी मो. बियाणी यांच्या आयोजनाने व जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लातूर जिल्ह्यातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वन्य भागात दि. २७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर रोजी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लाख बियांचे बीजारोपण (वड, चिंच, लिंब व पिंपळ) करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सागण्यात आले होते.सार्वजनिक उपक्रम असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी संमती दर्शवली त्यासोबतच प्रसारमाध्यमांनीही बातम्या प्रसारीत केल्या परंतू त्यानंतर मात्र आता या हेलिकॉप्टर चा वापर लातूर शहरातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यल्प दरात हवाई सफर देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. नेमके हे अल्प दर लावून हेलिकॉप्टर चे भाडे वसुली करायची आहे का..?का हवाई सफरीच्या लकी ड्रॉ च्या नावाने लातूरशहरातील नागरिकांचा आणि त्यांच्या पाल्यांचे नाव नोंदनी करुन डाटा गोळा करायचा..? काय चालू आहे लातूर मध्ये माननिय जिल्हाधिकारी साहेब ..आपण या गोष्टी साठी परवानगी दिली आहे का..?दिली असल्यास आपण खाजगी क्लाससाठी त्याचा वापर का करु देत आहेत.मुलांचे लक्ष सध्या अभ्यासांकडे अवश्यक असताना अनावश्यक गोष्टी कडे आपण का लक्ष केंद्रीत करत आहात..? अशी ओरड आता नागरिकांकडून आणि पालकांकडून होत आहे. हेलिकॉप्टर ची माहिती आणि सफर विनामुल्य असली तरी नाव नोंदणीचा घाट कशासाठी..?असे आता सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे.