प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटी निधीची तरतूद, परंतू लातूर मध्ये मदतीची तरतुद नसल्याचे सांगीतले
कोणाच्या सांगण्यावरून अधिकारी बोलतात..का अधिकारी कायमचं झोपेत असतात.
लातूर : लंपी चर्मरोगाच्या प्रादुर्भावाने संपुर्ण भारतच नव्हे तर महाराष्ट्रातही थैमान घातले आहे.जनावरांचा मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई देण्याचा निर्णय सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. एनडीआरएफच्या निकषानुसार ही मदत दिली जाणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देशही दिले आहेत. असे असताना मात्र लातूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी मात्र लम्पीने पशुधन हिरावले असल्यास;कसल्याही प्रकारची मदत नसल्याचे माहिती प्रसारमाध्यमांसमोर सोमवारी दुपारी4 वाजता झालेल्या पत्रकारपरिषदे मध्ये दिली.हे कोणाच्या सांगण्यावरून अधिकारी बोलतात..का अधिकारी कायमचं झोपेत असतात अशी चर्चा संपुर्ण लातूर जिल्ह्यात होवू लागली आहे
![]() |
पशुधन जपणुकीसाठी तातडीने पावले उचला :असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगीतले |
"जनावरांचा मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई देण्याचा निर्णय सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. एनडीआरएफच्या निकषानुसार ही मदत दिली जाणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देशही दिले आहेत.
बैठकीत पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे बाह्यस्रोतांद्वारे भरण्याबाबतदेखील मान्यता दिली. राज्यात पशुधनाला लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाईल. लम्पी रोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक लस, औषधी, साधनसामग्री अशा विविध बाबींवरील खर्चासाठी जिल्हा नियोजन समित्यांनी २०२२-२३ मधील उपलब्ध निधीतून १ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून रुपयाचे निर्देशही देण्यात आले आहेत."
हेल्पलाइन नंबर
लम्पी आजाराबाबत मदतीसाठी पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ किंवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक १९६२ यावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
पशुधन ही आपली संपत्ती आहे, त्याची जपणूक करणे आवश्यक आहे. लम्पीने पशूंना ग्रासले आहे. यावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक पावले तातडीने उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.सर्व पशुवैद्यकीय अधिकायांनी हा आजार रोखण्यावर बारकाईने लक्ष द्यावे. रोगनियंत्रण लसीकरणासाठी मोहीम राबवावी, पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी पशुपालकांच्या मदतीसाठी उपलब्ध राहावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत
"परंतू लातूर जिल्ह्यात मात्र लंपी बाबत जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव हे मात्र गंभीर नसुन ,लंपीबाधित १०२ जनावरे, ५ तालुक्यांत लंपीचा प्रभाव असतानाही लंपी साथरोगाने जनावर दगावल्यास मदतीची तरतूद नसल्याचे त्यांनी जाहिर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच लसी संदर्भातही आजुनपर्यंत लंपी वर लस नसल्याचे काही पत्रकारांनी सागीतल्यावर गोट फाॅक्स ही लस सध्या या रोगावर उपायकारक असुन आपण हिच लस मागणी केल्याचे सांगीतले.परंतू अभिनव गोयल यांना मात्र केंद्रशाशनाने स्वदेशी बनावटीची लस तयार झाल्याची माहितीच नसल्याचे समोर आले आहे.वास्तविक पाहता आत्मनिर्भर भारतासाठी केंद्र सरकारकडून अनेक पाऊले उचलली जात आहेत. मध्यतंरी कोरोनावर मात करणा-या भारतीय लसीच्या मोठ्या यशानंतर आता जनावरांच्या लंपी आजारावर भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी लस विकसित केली आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते ग्रेटर नोएडा दिल्ली येथील वर्ल्ड डेयरी समिटच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी सांगीतले.अधिकार्यांनी लंपी रोगाबद्दल माहिती असली तरी मात्र याबाबत सरकार कोंणते निर्णय घेत आहे,लसी संदर्भात पंतप्रधान नरेन्द्र मोदी काय बोलतात याकडे मात्र अधिकार्यांचे सपशेल दुर्ल़क्ष होत आहे, त्यामुळे आता हे अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून बोलतात..का अधिकारी कायमचं झोपेत असतात ,अशी चर्चा संपुर्ण लातूर जिल्ह्यात होवू लागली आहे."
लंपी आजाराबद्दल पत्रकार परिषदेमध्ये दिलेली माहिती
रेणापूर, औसा, निलंगा, अहमदपूर या ५ तालुक्यांतील १६ गावांत आज अखेर एकूण १०२ पशुधन लंपी साथरोगाने बाधित असून, ३ बैल वगळता इतर पशुधनात उपचारास चांगला प्रतिसाद मिळत आहे. ४ बाधित जनावरे पूर्ण बरे झाले आहेत. प्रथम रोग दिसून आलेल्या गावाला केंद्र धरून त्याभोवती ५ किमी त्रिजेच्या परिसरात असलेल्या जिल्ह्यातील ८५ गावांतील एकूण पशुधन संख्या ६६४२४ आहे. यापैकी गायवर्ग ३४९८३ इतकी आहे. हा आजार म्हशीमध्ये क्वचित प्रमाणात पसरत असल्याने या भागातील ३४९८३ इतक्या गोवंशास लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यापैकी आजवर १३२२२ लसीकरण पूर्ण झाले आहे. पशुधन वाचविण्यासाठी बाधित गावात ग्रामपंचायतीकडून कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात ११६७ पशुधनाच्या गोठ्यावर कीटकनाशक फवारणी करण्यात आली असून, लसीकरणासाठी सर्व पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे शीघ्र कृती दल तयार केले आहे. प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यक नियुक्त केला आहे. हा लंपी साथरोग संसर्गजन्य असून, बाधित जनावरांना स्वतंत्र व्यवस्थेत ठेवावे. या रोगाची लागण झालेल्या जनावराचे फार हाल होतात. लागण झाल्यास या रोगाचा प्रभाव पशुच्या शरीरात २ ते ५ आठवडे राहतो. लंपी साथरोगाने जनावरांच्या शरीरावर जखमा होतात. जनावर विद्रुप दिसते. अशा जनावरांना हाताळल्यानंतर सॅनिटायझर, डेडॉलने हात स्वच्छ करावेत. गोवंशीय जनावरांनाच अधिक बाधा होत असल्याचे चित्र आहे. हा लंपी आजार मुख्यतः चावणाऱ्या माशा, डास, गोचिड, चिलटे यांच्यामार्फत होतो अशी माहिती देण्यात आली
तालुकास्तरावर समिती
लातूर जिल्ह्यातील तालुकास्तरावर लंपी रोग नियंत्रणासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. आजाराची बाधा झाल्यास १९६२ या टोल फ्री क्रमांकावर पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.