सिटबेल्ट न वापरणार्या वाहन धारकावर खटले दाखल
लातूर-लातूर ट्राफिक पोलिसांनी सीटबेल्ट चा वापर न करणार्या वाहनधारकावर कार्यवाही साठी सोमवार पासून विशेष मोहिम राबविली जात आहे दरम्यान दोन दिवसात तब्बल ३०० वाहनधारकावर कार्यवाही करून ६१हजार रुपयाचा दंड ही वसुल करण्यात आला हि अतिशय कोतुकास्तब बाब आहे परंतू काही वाहने तर गजबजलेल्या ठिकाणी अतिशय १०च्या स्पीड ने चालते, सीटबेल्ट लावणे हा नियम आहे तो पाळलाच पाहिजे त्याबरोबरच अशा प्रकारच्या कार्यवाह्या कोठे करने अवश्यक आहे हि सतसद विवेक बुद्धि असने अवश्यक आहे,निव्वळ नियमावर बोट ठेवून दंड वसुल करणे योग्य नाही.लातूरची जनता शांतप्रीय आहे स्वत:नियम पाळण्यात आग्रसेर असते.परंतू काही अधिकारी मात्र सतसदविवेक बुध्दी गहाण ठेवल्यासारखे वागत असल्याची जोरदार चर्चा लातूर शहरामध्ये होवू लागली आहे.वाहन दोन चाकी असो कि चारचाकी गांधीचौक पोलिस स्टेशन च्यासमोरच उभाटाकून गाड्यांच्या चाव्या काढून घेण्यात येत आहेत.नेमकी अशी तपासणी करणे योग्य आहे का..?असा अता सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे.यावर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी वेळीच लक्ष घालून शहराच्या दिलेल्या जागेवर उभे टाकून दोषी वाहनांवर कार्यवाही करावी एवढी माफक आपेक्षा लातूरच्या जनतेकडून व्यक्त होत आहे