Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

धनदांडग्या शेठजी पुढे प्रशासनाकडून गरीब कुटुंबाची लूट

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर ते नांदेड़ रोड हायवे प्रकरण..
धनदांडग्या शेठजी पुढे प्रशासनाकडून गरीब कुटुंबाची लूट






मौजे महमदापूर पाटी ता.जि. लातूर येथील जमीन गट नं. 340 मौजे भातांगळी येथे लातूर रोड नांदेड रोडच्या उत्तरेस राम ज्ञानोबा बस्तापुरे व त्यांचे वडील इ गानोबा धोंडीबा बरतापूरे यांनी सन 1994 व 1995 मध्ये पक्के आर.सी.सी. मध्ये पहिल्या मजल्याचे बांधकाम केलेले असून सदर घर एकूण 6 खोल्या संडास बाथरूम, स्वयंपाक खोली व पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या व पहिल्या मजल्यावर 3 विटांना बांधलेल्या व त्यावर पत्रे घातलेल्या 3 खोल्या व तळमजल्यावर सदर घराच्या लगत दक्षिणेस दोन वडी पत्र्याचे छत केलेले आहे व त्यापुढे खुली जागा व त्यापुढे गोबरगॅस जमिनीतील पाण्याचा हौद व वेगवेगळी फळांची झाडे व सदर घरात राम बस्तापुरे यांनी सन 2005 साली विद्युत मीटर जोडणी घेतलेली आहे. सदर भर पूर्व-पश्चिम 38 फुट व दक्षिण उत्तर 59 फुट जागेवर आहे. सदर घरास लागून पश्चिमेस राम बस्तापूरे यांची सदर गटातील खुली जागा आहे व त्यानंतर शांताबाई ब्रबुवान गोमारे यांचे घर जागा होती.

गरिब कुटुंबाने वाचला कॅमेरा समोर आन्याचा पाढा...


राम बरतापूरे यांच्या सदर घराची नोंद महमदापूर व ग्राम पंचायतकडे असून त्याचा मिळकत क्रमांक 41 असा आहे. असे असतांना राम बस्तापूरे जमिनीच्या पश्चिम शेजारी सतीश रामचंद्र पल्लोड रा. लातूर यांनी तालूका निरिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी दारास हात मिळवणी करून सदर घराची नोंद राम बस्तापूरे यांच्या मुलाच्या नावे करून घेवून व राम बस्तापूरेच्या घरा लगतच्या पश्चिम बाजूच्या खुल्या जागेची नोंद राष्ट्रीय महामार्ग क्रं. 361 च्या संपादानाच्या संयुक्त मोजणीमध्ये स्वतःच्या नावाची नोंद करून घेवून राष्ट्रीय महामार्ग क्रं. 361 च्या प्राधिकृत अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी लातूर यांच्याशी संगनमत करून सदर संपादनाच्या अवार्ड ई. स्टेटमेंटमध्ये बालाजी बरतापूरे नावानी नोंदले त्या घराचा मावेजा स्वतःच्या नावे दाखवून सदर दोन्ही मिळकतीचा मावेजा संपादीत अधिकाऱ्याशी हात मिळवणी करून उचलून घेतलेला आहे त्याबाबत प्रकरणे न्याय प्रविष्ठ असतांना व सदर दोन्ही मिळकतीवर राम ज्ञानोबा यांची असतांना नायब तहसीलदार बी.व्ही. बेरूळे लातूर यांनी जिल्हाधिकारी लातूरच्या आदेशाने सदर मिळकतीचा सक्तीने ताबा घेण्यासाठी सदर मिळकतीवर सतीश रामचंद्र पल्लोड वबालाजी राम बरतापूरे यांचे नावाचा उल्लेख असलेली नोटीस दिनांक 07/09/2022 व दिनांक 06/09/2022 रोजी डकवून दिनांक 16/09/2022 रोजी सक्तीने ताबा घेण्याचे नमुद केले आहे.

वाटणीतील सदर दोन्ही मिळकतीत सतीश रामचंद्र पल्लोड व बालाजी राम बस्तापुरे यांचा संबंध नाही. त्यामुळे सदर मिळकतीचा ताबा घेतेवेळेस दिसत्या परस्थितीचा पंचनामा करून सदर मिळकतीचा ताबा राम बस्तापुरे यांच्याकडून घ्यावा असे वर नमुद नायब तहसीलदार यांनी विनंती अर्ज केला असता त्यांनी राम बस्तापूरे यांना अरेरावीची भाषा करून तो अर्ज फेकून दिला व यानंतर माझ्या कार्यालयात यायचे नाही आला तर पोलीस केस करू म्हणून धमकी दिली व सदर दोन्ही मिळकतीचां ताबा आम्ही सक्तीने घेऊ अशी धमकी दिली. त्यामुळे राम बस्तापूरे हा वृध्द असून त्यास दुसरा निवास नाही. तरी राम बस्तापूरे यांना न्याय मिळेल का ? त्यासाठी ते सर्व कार्यालयात जाऊन ही त्यांना कोणीही न्याय देत नाही व त्यांची हक्काची घर व जागा त्यांच्याकडून धनदांडग्याच्या सांगण्यावरून प्रशासन बेकायेदशीरपणे हिसकावून घेत आहेत. याची मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी नोंद घेवून राम बस्तापूरे यांना न्याय द्यावा म्हणून ते मुख्यमंत्री साहेबांना विनंती अर्ज करणार आहेत
Previous Post Next Post