समाजात तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह गाणी मिरवणुकी दरम्यान वाजवल्या होणार कारवाई
गणेश विसर्जन निर्विघ्नपणे व उत्साहात पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे लातूर पोलीसांचे आवाहन..
गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील अग्रवाल सभागृहात उदईक दिनांक 09/09/2022 रोजी पार पडणाऱ्या सार्वजनिक गणेश उत्सव मिरवणूक संदर्भाने बंदोबस्त कामी तैनात करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच इतर जिल्ह्यातून व पोलीस प्रशिक्षण केंद्रातून आलेल्या पोलिसांना पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी गणेश विसर्जन मिरवणुक बंदोबस्त संदर्भाने मार्गदर्शन व सूचना केल्या. यात बंदोबस्तावर असणारे अधिकारी व अंमलदार यांचे काय कर्तव्य आहेत व त्यांचे अधिकार काय आहेत याबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये लातूर शहरातील पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने हजर होते.
*तसेच गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान साऊंड सिस्टिम वर वाजविण्यात येणाऱ्या गाण्याबद्दल मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री.पृथ्वीराज बी.पी. यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2)अन्वये मिळालेल्या विशेष अधिकाराचा वापर करून सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह गाणी वाजविणे, त्या गाण्याची सीडी/ कॅसेट सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करणे व ताब्यात ठेवणे यावर गणेशोत्सव दरम्यानच्या कालावधीमध्ये बंदी घातली असून समाजात तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह गाणे वाजविण्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम 188,153 (1क) (अ) तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता 144(2) प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेशित केले आहे.*
तरी लातूर पोलिसांकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, लातूर यांनी दिलेल्या आदेशाचे व नियमांचे पालन करून गणेश विसर्जन निर्विघ्नपणे व उत्साहात आनंदी वातावरणात पार पाडण्यास सहकार्य करावे.
Tags:
Social News