Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

'माझं लातूर' परिवाराच्या वतिने संविधान उद्देशिकेचे मुंबईत होणार मोफत वितरण

'माझं लातूर' परिवाराच्या वतिने संविधान उद्देशिकेचे मुंबईत  होणार मोफत वितरण 





माझं लातूर परिवाराने शहर आणि जिल्ह्यातील विद्यालयात मोफत "संविधान उद्देशिका" वितरण करण्याचा अनोखा उपक्रम यशस्वीपणे राबविला. हा उपक्रम लातूर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून नजिकच्या नांदेड, कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात पार पडला. आता या उद्देशिका राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात पोहोचणार आहे.

जगातील सर्वात मोठी यशस्वी लोकशाही म्हणून आपल्या देशाची ओळख भारतीय संविधानाने निर्माण केली आहे. याप्रती शालेय विद्यार्थ्यामध्ये आदर, आपुलकी आणि बालमनावर संविधानाची उद्दिष्टे रुजविली पाहिजे या हेतूने माझं लातूर परिवाराने हा दिशादर्शक उपक्रम राबविला. शाळा, शासकीय कार्यालयात दर्शनी भागात या उद्देशिका परिवारातील मान्यवर सदस्यांच्या प्रयत्नातून लावण्यात आल्या आहेत.

परिवाराचे सदस्य तथा पत्रकार के. वाय. पटवेकर यांच्या पुढाकारातून आता हा उपक्रम मुंबईत राबविला जाणार आहे. काल या उद्देशिका मुंबईकडे रवाना करण्यात आल्या असून माझं लातूर परिवाराचे मुंबईस्थित ज्येष्ठ पत्रकार आनंद गायकवाड, योगेश सपकाळे यांच्या मार्गद्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येईल.
Previous Post Next Post