- डॉ. प्रमोद घुगे
वैद्यकीय क्षेत्रासाठी असे प्रकार भविष्यात घातक ठरणार..!
लातुरातील डॉक्टरांना जीवे मारण्याच्या धमक्या, प्राणघातक हल्ले आणि ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा प्रकार लातुरातील काही संघटनांचे पदाधिकारी करीत आहेत. चुकीच्या बातम्या समाजात पसरवून बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. वैद्यकीय क्षेत्रात असे प्रकार सर्रास घडताना सामूहिक विरोध करण्यासाठी कोणीही पुढे येत नसून भविष्यात ते घातक ठरणार आहे असे मत आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल लातूरचे संचालक डॉ. प्रमोद घुगे यांनी ता. 14 सप्टेंबर 2022 वार बुधवार रोजी अंजनी हॉटेल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले.
संतोष लातुरे वय ३८ वर्ष रा. खाड्गाव रोड लातूर हा रुग्ण मागील दहा ते बारा वर्षांपासून अती प्रमाणात दारू पित होता त्यामुळे त्याचे लिव्हर फेल झाले होते यासाठी मागील दोन वर्षांपासून तो लातुर मधील UNIQUE HOSPITAL मध्ये Dr. MANOJKUMAR BHADKE SIR यांच्याकडे उपचार घेत होता. यासाठी तो मागील एक वर्षांमध्ये तीन वेळा युनिक हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होता. दि ६/९/२२ रोजी सकाळी दम लागणे सर्व अंगावर सूज येणे दोन दिवसापासून लगवी बंद होणे व जेवण कमी होऊन उलट्या होत असल्यामुळे व रक्तदाब कमी असल्यामुळे युनिक हॉस्पिटल मध्ये डॉ. मनोजकुमार भडके यांच्या अंडर ऍडमिट झाला. तपासण्या केल्या असता त्याच्या किडनी फेल झाल्या आहेत लिव्हर फेल झाले आहे निमोनिया दोन्ही फुपुसामध्ये सुज येऊन निमोनिया झाला आहे व संडास मधुन रक्तस्त्राव होत असल्याने व पेशंटची कंडिशन सिरीयस असल्याने डॉ. भडके यांनी पेशंटला डायलेसिस करण्यासाठी आयकॉन हॉस्पिटल लातुर येथे ऍडमिट केले. ऍडमिट केल्यानंतर पेशंटची कंडिशन सिरीयस आहे व कितीही पैसे खर्च केले तरी पेशंट वाचेल कि नाही याची खात्री देता येत नाही अशी माहिती डॉ. मनोजकुमार भडके, डॉ. प्रमोद घुगे व डॉ. योगिनी थोरात मॅडम यांनी पेशांटच्या नातेवाईकांना ऑडिओव्हिजुअल उपकरना खाली घेऊन दिली. या पेशंटला डॉ. मनोजकुमार भडके, डॉ. प्रमोद घुगे व डॉ. योगिनी थोरात मॅडम यांनी मिळून सर्व योग्य ती ट्रीटमेंट दिली परंतु पेशंटची कंडिशन सिरीयस होत जाऊन तो दि. ९/९/२२ रोजी मयत पावला. पेशंट मयत पावल्यानंतर पेशंटचे नातेवाईक , रुग्णहक्क संरक्षण / संघर्ष समिती याचे मुख्य ऍड. निलेश करमुडी व इतर काही संघटनांचे १५० ते २०० कार्यकर्ते हे आयकॉन हॉस्पिटलच्या समोर आले. त्यांनी हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने घुसून आयकॉन हॉस्पिटलचे डॉ., कर्मचारी व डायलिसिस टेक्निशियन याना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व पेशंटची ओरिजिनल हॉस्पिटल फाईल पळऊन नेली व त्यातील महत्वाची कागदपत्रे काढुन घेतले. त्यानंतर या संघटनांनी जबरदस्तीने हॉस्पिटल, मेडिकल व ओपीडी बंद नाही केले तर आम्ही त्याला जाळ लाऊ व हॉस्पिटल मध्ये तोडफोड करू अशी धमकी देऊन जबरदस्तीने बंद कराला लावले. हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असलेल्या इतर पेशंटची सर्व्हिस बंद करून टाकली व त्यांच्या जिवाला धोका निर्माण केला. पोलिसांच्या समोरच या सर्व घटना घडल्या परुंतु पोलिसांनी वेळेवर सहकार्य केल्याने अनर्थ टळला. त्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व जमाव हॉस्पिटलच्या समोरच थांबुन राहिला व त्यांनी पेशंटची बॉडी पोष्टमार्टम साठी नेऊ दिली नाही व पोलिसांच्याहि कामात अडथळा निर्माण केला. पेशंटच्या नातेवाईकांनी व ऍड. निलेश करमुडी यांच्या सांगण्यानुसार डॉक्टरांच्या नातेवाईकांना आम्हाला जर तीस लाख रु. खंडणी दिली तर आम्ही कुठलीही तक्रार करणार नाही असे सांगितले.
अशा प्रकारे मयत रुग्णाच्या नातेवाईकास समोर करून हॉस्पिटलमध्ये व बाहेर चित्रीकरण करुन ऍड. निलेश करमुडी यांनी खोट्या बातम्या तयार केल्या व त्या सोशल मीडिया व इतर माध्यमाद्व्यारे पसरवल्या त्यामुळे आयकॉन हॉस्पिटल येथे काम करणारे डॉक्टर व लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले अशा प्रकारच्या घटना या लातूर मधील सर्व हॉस्पिटल मध्ये घडत आहेत परुंतु डॉक्टर संघटनांनी ऍड.निलेश करमुडी व त्याच्यासारख्या इतर संघटना यांच्यावरती ठोस कारवाई नाही केल्यामुळे अशा संघटनांनचे पेव लातूरमध्ये वाडले आहे व त्यामुळे लातूरमध्ये वैद्यकीय व्यवसाय करणे अत्यंत कठीण झाले आहे त्यामुळे बरेचसे सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर लातूर सोडून इतर ठिकाणी स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत.
अशा बोगस ब्लॅकमेलींग करणाऱ्या संघटनांना वेळीच आवर नाही घातला तर लातूरमधील कुठलेही डॉक्टर सिरीयस पेशंटला ऍडमिशन देणार नाहीत व अशा पेशंटला मुंबई, पुणे, हैद्राबाद, सोलापुर अशा जागी जावे लागेल व प्रवासादरम्यान पेशंटचा मृत्यु होण्याचे प्रमाण वाढेल तसेच पुढील काळात कुठलाही चांगला डॉक्टर लातूर मध्ये येण्याचा विचारही करणार नाहीत व याचे नुकसान लातूरच्या सर्वसामान्य रुग्णांना होईल. कुठलाही डॉक्टर पैशे खर्च करून अत्याधुनिक हॉस्पिटल काढण्याची हिम्मत करणार नाही व लातूर हे वैद्यकीय दृष्ट्या मागासलेले राहील अशी चिंता डॉ.प्रमोद घुगे व डॉ योगिनी थोरात मॅडम यांनी पत्रकार परिषद दरम्यान व्यक्त केली.
लातुर शहर हे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते व भारतातील सर्वात जास्त डॉक्टर हे लातूर मधूनच तयार केले जातात परंतु डॉक्टरांसोबत पेशंटच्या नातेवाईकांनी व संघटनांनी गुंडगिरी करून पैशे वसुलीचे काम चालु ठेवले तर लातूरचा शिक्षण पॅटर्न याला पण फार फटका बसु शकतो कारण नवीन नीट परीक्षेची तयारी करणारे विद्याथी हे डॉक्टरी पेशाला होणारा त्रास पाहुन इतर क्षेत्रमध्ये जातील असे मत डॉ. प्रमोद घुगे व डॉ. योगिनी थोरात मॅडम यांनी मांडले.
कुठलेही वैद्यकीय ज्ञान नसताना सत्य लपऊन चुकीचे व्हिडीओ तयार करून ते समाज माध्यमामध्ये पसरवून पेशंटचे नातेवाईक, ऍड. निलेश करमुडी व इतर संघटना यांनी आयकॉन हॉस्पिटल, हॉस्पिटल स्टाफ व डॉ.प्रमोद घुगे यांची जाणीवपूर्वक बदनामी केली त्यामुळे आयकॉन हॉस्पिटल व डॉ. प्रमोद घुगे यांच्या प्रतिष्ठेला कधीही भरून न निघणारे नुकसान केले आहे.
तरी खंडणी वसूल करणाऱ्या संघटना व डॉक्टरांची जाणीवपुर्वक बदनामी करणारे, त्यांना साथ देणारे, डॉक्टरांना व हॉस्पिटल स्टाफला मारहाण करून शिवीगाळ करणारे, हॉस्पिटल व मेडिकल जबरदस्ती बंद करून इतर पेशंटच्या जीवास धोका निर्माण करणारे पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करणारे व हॉस्पिटलचे डॉक्युमेंट जबरदस्ती नेऊन पुरावे नष्ट करणारे पेशंटचे नातेवाईक, ऍड. निलेश करमुडी व इतर संघटना यांच्यावर कठोरात कठोर कारवाई लवकरात लवकर करावी अशी मागणी आयकॉन हॉस्पिटलचे स्टाफ व डॉ. प्रमोद घुगे यांच्या तर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली.
जनतेनी सत्य जाणून घेऊनच बातमी खरी आहे का खोटी आहे हे तपासूनच मग त्यावर योग्य ती प्रतिक्रिया द्यावी.
खोट्या व अर्धवट बातम्या तयार करून समाजामध्ये गैरसमज पसरवणाऱ्या रुग्ण हक्क संघर्ष / संवर्धन समितीच्या ऍड. निलेश करमुडी व पेशंटचे नातेवाईक यांच्या बातम्याला कुठेही समाज माध्यमावर पसरऊ नये अन्यथा खोट्या बातम्या पसरवनाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा ईशारा डॉ. प्रमोद घुगे यांनी दिला व जा लोकांनी आतापर्यंत समाज माध्यमावर चुकीच्या बातम्या पसरवल्या आहेत त्यांनी स्वतःहुन समोर येऊन प्रसार माध्यमामध्ये जाहीरपणे माफी मागितल्यास त्यांना माफ करण्यात येईल असेही डॉ. प्रमोद घुगे यांनी या परिषदेत सांगितले.
या प्रसंगी डॉ. प्रमोद घुगे, डॉ. योगिनी थोरात मॅडम, डॉ. प्रतिभा घुगे यांच्यासह आयकॉन हॉस्पिटल स्टाफ व आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले व उपचार घेऊन दुरुस्त झालेले रुग्ण व पत्रकार बांधव उपस्थित होते.
आयकॉन हॉस्पिटलमध्ये खूप चांगले उपचार भेटतात खूप चांगले डायलिसीस होते व अत्यंत कमी पैशामध्ये उपचार होतात तसेच डॉ. प्रमोद घुगे हे खरोखरच लातूरला लाभलेला एक हिरा आहे व त्याचे जतन करणे ही समस्त लातूरकरांची जबाबदारी आहे असे मत तेथे उपस्थित असलेले सदाशिव शिंदे, धनराज माने , उत्तरेश्वर शिंदे, राम रेड्डी या रुग्णांनी केली. डॉ. प्रमोद घुगे हे लातूर मध्ये उपलब्ध असल्यामुळेच आम्हाला आतापर्यंत जीवदान मिळाले आहे असे सर्व रुग्णांनी सांगितले.