शिक्षक दिना निमित्त माझं लातूर परिवाराने ग्रामीण भागातील विद्यालयात संविधान उद्देशिका दिली भेट
*माझं लातूर परिवाराचा सीमावर्ती भागातील स्तुत्य उपक्रम..!*
औराद/जळकोट :- आज दिनांक ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून माझं लातूर परिवाराच्या वतीने सीमावर्ती भागातील औराद शहाजनी आणि जळकोट तालुक्यातील होकर्णा, उमरदरा येथील शाळेत "संविधान उद्देशिका" भेट देऊन शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शहाजनी औराद येथे वसंतराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता माने आणि रहेमानिया उर्दू हायस्कूलचे सहशिक्षक मुल्ला खलील यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करुन त्यांना परिवाराच्या वतीने "संविधान उद्देशिका" भेट देण्यात आली.
साेलापुरर ग्रामीणचे सपाेनि नितीन थेेटे, औराद पाेलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गाेपाळ शिंदे यांच्या हस्ते ही भेट देण्यात आली. याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुधाकर शेटगार, अडत व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक थेटे, पत्रकार दीपक थेटे, लक्ष्मण पाटील, बालाजी थेटे, आत्माराम थेटे ,सुरेश थेटे, दत्ता उगिले आदी मान्यवर उपस्थित हाेते. तर जळकोट तालुक्यातील होकर्णा येथील जि प प्राथमिक शाळा, उमरदरा येथील श्रीराम प्राथमिक आश्रम शाळा येथील शिक्षकांचा सत्कार करून संविधान उद्देशीका भेट देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक व्ही बी तेलंग, एस एन शिवनगे, जी आर भुरे, बी एस धुळशेटे,जी एच हावा, एन जी जाधव, मुख्याध्यापक भिमराव जाधव, ब्रम्हाजी केंद्रे, पांचाळ, मांदळे, गीते आदी मान्यवर उपस्थित होते.
माझं लातूर परिवाराच्या वतीने जिल्हाभरात विविध समाोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून आज परिवाराचे शाहाजनी औराद येथील क्रियाशील प्रतिनिधी पत्रकार बालाजी थेटे, दिपक थेटे, तर जळकोट तालुक्यातील प्रमुख काशिनाथअप्पा बळवंते यांनी पुढाकार घेत हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. सीमावर्ती भागातील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, संविधानप्रेमी नागरिक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.