मोहा दारू व देसी दारू वर धाड , तब्बल दोन लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त
ग्राम लाखपुरी मूर्तिजापूर विशेष पथकाची कार्यवाही
अकोला जिल्हा मुर्तीजापुर ग्राम लाखपुरी येथे
दि : ०७/०९/२०२२ रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर साहेब यांच्या आदेशाने विशेष पथक मूर्तिजापूर तालुक्यात अवैध धंद्यावर रेड करण्या कामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमी दार्कडून खात्रीलायक बातमी मिळाली की काही इसम ग्राम लाखपुरा येथे गावरान मोहा हातभटी ची दारू काडून विक्री करीत आहे व एक इसम हा देसी दारू ची वाहतूक करीत आहे तेथे पाहणी केली असता पाच इसम १)करण मोहन कौथ्वास वय २८ रा लाखपूरी २)दीपक सुभाष सातकुठे वय २७ रा लाखपुरी ३) प्रशांत सुरेश गामोत वय २८ रा ब्रुझ्वडा ४)सुनील दीपक इंगळे वय २६ रा लाखपूरी ५)प्रभुदास वासुदेवराव ढोरे वय ३५ रा प्लॉट लाखपुरी अवैध रित्या मोहा हातभटी ची दारू बनवताना व विक्री करताना मिळून आले त्यांच्या जवळून देसी मोहा दारू व दारू बनिवण्याच्या साहित्य असा एकूण १,७२,००० रू चा मुदेमाळ जप्त करण्यात आला आहे व एक इसम अर्जुन देविदास कौथ्वस वय २४ रा लाखपुरी हा अवैध रित्या दारू ची वाहतूक करताना मिळून आला त्याच्या जवळून एक मो सा TVS JIVE MH30 AJ 3651 व एक देसी दारू ची पेटी किँमत ३३,५०० रू चा मुदेमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे
*सदर दोन कारवाहित ६ अरोपिन विरुद्ध गुन्याची नोंद करण्यात आली असून एकूण २,०५,५०० रू चा मुदेमाळ जप्त करण्यात आला आहे*
*सदर कारवाहित मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील साहेब व त्यांच्या पथकांनी केली आहे*