Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

IIबी क्लासवाल्याने लावले दुसर्या क्लासवाल्यांचे 'निट Topers' चे फोटो

IIबी क्लासवाल्याने लावले दुसर्या क्लासवाल्यांचे 'निट Topers' चे  फोटो
..पैशाचा माज असलेला 'चिराग' हुडकुन सापडणार नाही..!



लातूर-लातूर शहरामध्ये असलेल्या उद्योग भवन परिसरात ट्युशन घेणार्यांची संख्या तुफान वाढली आहे,त्याचे मुळ कारण म्हणजे लातूर ही शिक्षणाची पंढरी मानली जाते.परंतू काही वर्षापासून या पंढरीला बाहेरून येणार्या क्लासवाल्यांनी बदनामीच्या खाईत लोटले आहे.त्याला कारणही तसेच झाले आहे.काही दिवसापुर्वी निट चा रिझल्ट लागला.या मध्ये भारतातून लाखों विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता,त्यामधून काहि विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम कामगिरी करुन प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला.त्यामुळे या परिसरात संपुर्ण माराष्ट्रातून विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढून एकच गर्दी झाली आहे.२० वर्षापासून या ठिकाणी शिक्षण देणार्यांची संख्या बोटावर मोजण्याईतकी आहे.काही दिवसापुर्वी निट चा रिझल्ट लागला.या मध्ये भारतातून लाखों विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता,त्यामधून काहि विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम कामगिरी करुन प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला अशा विद्यार्थ्यांना हेरण्याचे काम या काही महिन्यांपुर्वी आलेल्या IIबी क्लासवाल्याने केले असल्याची जोरदार चर्चा सध्या लातूर शहरामध्ये होवू लागली आहे. असा स्वत:पैशाचा माज असलेला 'चिराग' हुडकुन सापडणार नसल्याचे आता उघड क्लासच्यापरिसरात बोलले जावू लागले आहे.हुडकुन न सापडणारा'चिराग'पैशाच्यासमोर नतमस्तक झाला आहे,त्याला गोरगरिब विद्यार्थी असो वा पालक तो कोणाचीही दयामाया करत नसुन अतिषय अर्वाच्च भाषेत बोलत असल्याचे आता विद्यार्थ्यांकडून उघड बोलले जावू लागले आहे.पत्रकार असो कि सामाजिक कार्यकर्ता असो भेटण्यासाठी तो टाटा बिर्ला सारखे वागत असल्याचे आता उघड होवू लागले आहे.असा प्राध्यापक विद्यार्थ्यांकडे काय लक्ष देणार..?असे चित्र आता समोर दिसत आहे.
  पैशाच्या जोरावर कोठेतरी आपल्या क्लासमध्ये त्या विद्यार्यांचे नाव रजिस्टरवर नोंद करुन ठेवून मग तो विद्यार्थी फक्त विचारपुस करायला आला असेल तरी ही,आणि नंतर करोडोंच्या जाहिराती देवून त्यामध्ये अशा विद्यार्थ्यांचे फोटो सत्कार करताना किंवा आपल्या क्लासमधून अभ्यास करुन गुण घेतल्याचे दाखवतात.भोळी भाबडी जणता ह्या सर्व गोष्टीपासून दुर असते आणि ते आशा मीमी म्हणणार्या क्लासच्या लुभावणार्या जाहिराती मध्ये आडकतात.
त्याची एक उत्कृष्ट पळवाट या क्लासवाल्यांनी शोधून काढली आहे ते म्हणजे निट मध्ये प्रथम येणार्यांच्या समोर ग्रुप(PCB) लिहितात म्हणजे तो कुठल्यानाकुठल्या विषयामध्ये तो झासेबाज क्लासवाल्यांकडे येतो त्यामुळे त्यांचे फोटो तो बिनदिक्कत पणे लावतो, वरून त्यांच्या नातेवाईकांना सुध्दा नगद रक्कम देवून गप्प केले जात असल्याचे सांगीतले जात आहे.परंतू या सर्व गोष्टीचा परिणाम मात्र मुलांवर होतो आणि खेङयापाङयातून आलेले पालक मात्र नाईलाजाने अशा चुकिच्या क्लासमध्ये प्रवेश घेतात आणि आपल्या पालकांना अर्थिक अडचणित आणतात. 
आता पालकांनी सावध.. व्हायला हवे , लाखों रुपए खर्च करुण विद्यार्थी प्रथम आल्यावर त्याचा सौदा करु नका...असे कोणी केले असेल तर पालकांनी रितसर तक्रार करुन त्याला धडा शिकवावा असे आता सर्वसाधारण नागरिकांकडून पालकांकडून बोलले जावू लागले आहे. यावर सध्या प्रशाशनाचे कसलेही नियंत्रण नसुन भविष्यातही काही बदल होईल असे दिसत नाही.कारण प्रथम क्रमांक येणार्या विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या भविष्यासाठी पुढे शिक्षण घ्यायचे असते,ते आपल्या आनंदात मग्न असतात.परंतू त्यांच्या पालकांनी काळजी घ्यावी जेणेकरुन नविन येणार्या विद्यार्थ्यांचे एकच फोटो तिन जाहिरातीमधून दिसणार नाहित..!
Previous Post Next Post