Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

'संकल्प अकॅडमीच्या' विद्यार्थ्यांनी मिळवले NEET UG परीक्षेत घवघवीत यश

'संकल्प अकॅडमीच्या' विद्यार्थ्यांनी मिळवले NEET UG परीक्षेत घवघवीत यश




पी व्ही सरांच्या संकल्प अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी NEET UG परीक्षेत घवघवीत यश मिळवून लातूर मधील यशाची परंपरा अबाधित ठेवली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) UG, 2022 साठी निकाल प्रसिद्ध झाला आहे. ही परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात आली होती. एका अहवालानुसार, सुमारे 18.72 लाख उमेदवारांनी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ANTA नुसार, 95 टक्के उमेदवार NEET UG मध्ये बसले होते. वैद्यकीय प्रवेश परीक्षा भारतातील 497 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 3,570 केंद्रांवर घेण्यात आली. NTA द्वारे घेण्यात आलेल्या नीट 2022 परीक्षेत संपूर्ण भारतातून 17 जुलै 2022 रोजी 18 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हि परीक्षा दिली होती. राज्यात शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्न निर्माण करण्यात मोलाचा वाटा असलेल्या पी व्ही सरांच्या संकल्प अकॅडमीने सर्वात चांगला निकाल दिला आहे. NEET 2022 मध्ये 600 मार्कच्या वर मार्क घेऊन उत्तीर्ण झालेले 250 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. हे यश पी व्ही सरांच्या टिमचे आणि विशेषता दिवस रात्र मेहनत घेऊन आभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आहे. दि 12 सप्टेंबर वार सोमवार रोजी पी व्ही सरांच्या संकल्प अकॅडमीच्या वतीने या चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा डिजे लावून ट्युशन ऐरियात मिरवणूक काडून विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला. या वेळी पी व्ही सर बोलताना म्हणाले की हे यश हे विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आहे. आणि संकल्प अकॅडमीच्या सर्व शिक्षक मंडळींचे आहे. या विद्यार्थ्यांनी मोठे डॉक्टर होऊन देशाची आणि समाजाची सेवा करावी आणि भविष्यात कधी भेट झालीतर संकल्प अकॅडमीची आठवण ठेवावी

संकल्प अकॅडमीच्या वतीने या चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा डिजे लावून ट्युशन ऐरियात मिरवणूक काडून विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला










Previous Post Next Post