NEET निकालाची खोटी जाहिरात करून पालकांची अर्थिक फसवणूक करणाऱ्या क्लास चालकावर गुन्हे दाखल करा..
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना लातूर च्या वतीने पोलीस अधीक्षक याना निवेदन
लातूर शहरामध्ये असलेल्या उद्योग भवन परिसरात ट्युशन घेणार्यांची संख्या तुफान वाढली आहे,त्याचे मुळ कारण म्हणजे लातूर ही शिक्षणाची पंढरी मानली जाते.परंतू काही वर्षापासून या पंढरीला बाहेरून येणार्या क्लासवाल्यांनी बदनामीच्या खाईत लोटले आहे. मागील काही दिवसापासुन काही क्लावाल्यांनी नीट मध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांचे एकच फोटो जाहिराती मध्ये लावल्याची चर्चा संपुर्ण लातूर शहरामध्ये झाली यामध्ये क्लासवाल्यांनी खुलासा सादर केला परंतू या मध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने उडी घेतली असून पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांना NEET निकालाची खोटी जाहिरात करून पालकांची अर्थिक फसवणूक करणाऱ्या क्लास चालकावर गुन्हे दाखल कराण्यासंदर्भात नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
यानिवेदनात म्हटले आहे की ,नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागला असून सर्वाधिक घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे फोटो अनेक क्लासेसच्या जाहिरातीत झळकत आहेत त्यात आदित्य केंद्रे श्रुतीवीर पारस सूर्यवंशी हे आरसीसी व इतर क्लासेसच्या जाहिरातीत दाखवण्यात आले आहेत एकच विद्यार्थी एकापेक्षा जास्त क्लासेसचा कसा असू शकतो समजा असेलच तर या विद्यार्थ्यांचे प्रवेश हे नीट क्लासेस ची सराव परीक्षा क्रॅश कोर्स किंवा पूर्ण वेळ क्लासला होते असे ठळक जाहिरातीवर उल्लेख न करता फक्त फोटो व मार्क जाहिरातीवर टाकून आमच्याच क्लासचा विद्यार्थी असे सांगून पालकांची व विद्यार्थ्यांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक करतात.
वरील सर्व प्रकारावरून असे निदर्शनास येते की सर्वाधिक मार्ग घेणारा विद्यार्थी आमच्याच क्लासेसचा आहे असे दाखवून आपण ही आमच्या क्लासेस मध्ये आपल्या पाल्यांना घालावे असे प्रलोभन देण्यासाठी खोटी जाहिरात केली जात आहे या खोट्या जाहिरातीच्या माध्यमातून क्लास संचालक पालकांची दिशाभूल करून आपल्या पाल्याला आपल्या क्लासेस मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवर्त करून त्यांची आर्थिक लूट करत आहेत.
त्यामुळे खोट्या जाहिराती करून विद्यार्थ्यांची आर्थिक पासून करणाऱ्या संबंधित क्लास संचालकाची कायदेशीर चौकशी करून त्यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत असे सांगण्यात आले आहे.
यावेळी सोबत संतोष नागरगोजे प्रदेश सरचिटणीस संजय राठोड जिल्हाध्यक्ष नरसिंह भिकाने जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण जिल्हाध्यक्ष मनविसे भागवत शिंदे राज्य उपाध्यक्ष शेतकरी सेना मनोज अभंगे शहराध्यक्ष लातूर
बालाजी कांबळे शहराध्यक्ष अजय कलशेट्टी बजरंग ठाकूर मनविसे शिवप्रसाद जिडगे धनंजय मुंडे अजिंक्य मोरे जहांगीर शेख चंदू केंद्रे योगेश सूर्यवंशी अजित पुजारी विवेक कलवले अजिंक्य चिवडे किरण लवटे ध्रुव महापूरकर तसेच अनेज पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते