'नीट- २०२२' मध्ये मोटेगावकर सरांच्या 'RCC' चा महाराष्ट्रात No.1 रिझल्ट
आतापर्यंत हाती आलेल्या निकालात ६०० पेक्षा अधिक गुण घेणारे RCC चे १९३ तर ५०० पेक्षा जास्त तब्बल ९०० हून अधिक विद्यार्थी
888
लातूर (प्रतिनिधी)- उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी अनिवार्य असलेल्या NEET परीक्षेचा निकाल बुधवारी रात्री उशिरा जाहीर झाला. यामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही प्रा. शिवराज मोटेगावकर सर संचालित RCC च्या विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड ब्रेक यश मिळविले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार RCC चे शिलेदारचं सर्वोत्तम ठरले. आहेत. यामध्ये RCC च्या ३६ विद्यार्थ्यांनी ६५० पेक्षा अधिक
गुण, १९३ विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा अधिक गुण तर तब्बल
९०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक गुण मिळवून नेत्रदीपक यश मिळविले आहे.
मागील तब्बल २२ वर्षांपासून सर्वाधिक डॉक्टर चडविणारी शिक्षण संस्था म्हणून प्रा. शिवराज मोटेगावकर सर संचालित RCC चा देशभरात नावलौकिक झाला आहे.
प्रा. शिवराज मोटेगावकर आणि संपूर्ण RCC च्या टीमने
घेतलेले ज्ञानदानातील कठोर परिश्रम, विद्याथ्र्यांनी केलेल्या अभ्यास रुपी कष्टाचा बळावर नुकत्याच जाहीर झालेल्या NEET २०२२ मध्येही यशाची परंपरा कायम राखत RCC च्या विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठे यश प्राप्त केले आहे. अद्यापही निकाल येणे सुरू असून लवकरच सर्व निकाल हाती आल्यानंतर RCC हीच महाराष्ट्रात सर्वोत्तम असल्याचे वर्तविण्यात येत आहे. हाती आलेल्या निकालानुसार
RCC च्या आदित्य केंद्रे, पारस सूर्यवंशी, श्रुती वीर यांनी ७२० गुणांपैकी प्रत्येकी ६९० गुण, हर्षल बोकडे ६८० गुण, सौरभ महाडिक ६७६ गुण यांच्यासह अनेक विद्याथ्र्यांनी ६५० पेक्षा अधिक गुण घेऊन उज्वल असे यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे RCC चे संचालक ठरणार प्रा. शिवराज मोटेगावकर सर यांच्यासह संपूर्ण RCC टीमच्या वतीने कौतुक केले आहे.
"मागील २२ वर्षांपासून विद्याथ्र्यांना त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करत RCC ने आपली उत्तमता, वेगळेपण आणि प्रतिभा दाखवून दिली आहे. प्रतिवर्षी RCC च्या हजारो विद्यार्थ्यांना देशातील नामांकित AIIMS, MAMC आणि अनेक नामांकित मेडिकल कॉलेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी प्रवेश मिळतो. तरी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही १५०० पेक्षा अधिक विद्याथ्र्यांना MBBS साठी नक्कीच प्रवेश मिळेल हे नक्की."
-प्रा. शिवराज मोटेगावकर, संचालक आरसीसी पॅटर्न