राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत संशयित हृदयरोगी बालकांचे 2 डी ईको शिबीरात 99 बालकांची तपासणी
31 बालकांवर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान
लातूर - दि.08 ऑक्टोंबर 2022 रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शाळा व अंगणवाडीतील वय 0 ते 18 वयोगटातील संशयीत हृदयरोगी बालकांचे 2 डी ईको शिबीर न्यू लाईफ हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल औसा रोड लातूर, येथे संपन्न झाले.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळा व अंगणवाडीतील तपासणी मध्ये वैद्यकीय पथकामार्फत संशयीत हृदयरोगी मुलांचे 2 डी ईको शिबिर घेण्यात आले. सदरील बालकांचे शिबीर डॉ पंकज सुगावकर बाल हृदयरोग तज्ञ यांनी केले. शिबिरामध्ये 99 मुलांची तपासणी करण्यात आली असून 31 मुलांना शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. त्यांना पुढील शस्त्रक्रिया करण्याकरिता सह्याद्री हॉस्पिटल पुणे, जुपिटर हॉस्पिटल मुंबई, कोकिळाबेन हॉस्पिटल मुंबई, व रुबी हॉल पुणे येथील हॉस्पिटल ला संदर्भित करून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. असे डॉ पंकज सुगावकर यांनी सांगितले.
सदरील शिबिरासाठी डॉ लक्ष्मणराव देशमुख (जिल्हा शल्यचिकित्सक) डॉ मोनिका पाटील (निवास वैद्यकीय अधिकारी) डॉ श्रीधर पाठक (नेत्र शल्यचिकित्सक) तसेच डॉ आनंद कलमे यांच्या मार्गदर्शन नुसार पाडण्यात आले. सदरील शिबिराचे नियोजन श्री अमोल झेंडे (जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक) श्री सोनकांबळे राजेंद्र (कार्यक्रम सहाय्यक) यांनी केले तसेच जिल्ह्यातील कार्यरत वैद्यकीय पथकातील वैद्यकीय अधिकारी,औषध निर्माता,व एनएम यांनी बालकांना मार्गदर्शन करून मुलांना सदरील शिबिरासाठी आणून शिबीर यशस्वी केले.