Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मे.देश ऍग्रो प्रा.ली या कंपनीला अनेक प्रस्ताव प्रलंबित असताना केवळ 22दिवसात भुखंड मंजुर

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
मे.देश ऍग्रो प्रा.ली या कंपनीला अनेक प्रस्ताव प्रलंबित असताना केवळ 22दिवसात भुखंड मंजुर
अतिरिक्त एम आय डी सी कडून देशमुख घराण्याला झुकते माप
 






लातूर-2019 सालापासून भूखंड मागणीचे एकूण 16 प्रस्ताव प्रलंबित असताना मे. देश ऍग्रो प्रा. ली या कंपनीला केवळ 22दिवसात भुखंड मंजुर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला असुन 
मे. देश ऍग्रो प्रा. ली ही कंपनी 23 मार्च 2021 रोजी स्थापन झाली.आणि काही वर्षातच या कंपनीला दोन्ही बॅंकांनी मिळून 120 करोड रुपयाचे कर्ज वाटप केले असल्याची माहिती देण्यात आली तसेच या कंपनीमध्ये श्री रितेश विलासराव देशमुख व जेनेलिया देशमुख हे 50-50 टक्क्यांचे भागीदार असल्याचे सांगण्यात आले आहे. स्थापने वेळी कंपनीचे भागभांडवल 7.50 कोटी रुपये असल्याची माहिती गुरुनाथ मगे शहर जिल्हाध्यक्ष भाजपा, लातूर आणि ॳॅड.प्रदिप मोरे शहर उपजिल्हाध्यक्ष भाजपा, लातूर यांनी बुधवार दिनांक 19आक्टोंबर रोजी पत्रकार परिषद घेवून सांगीतले आहे.
कंपनीने अतिरिक्त एम आय डी सी लातूर येथे ऍग्रीकल्चर प्रोसेस उद्योगासाठी भूखंड मागणीचा अर्ज दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी केला. त्यावर 9 एप्रिल रोजी मुंबईत बैठक झाली व 15 एप्रिल 2021 रोजी कंपनीस 252726 चौ मी क्षेत्रफळाचा भूखंड मंजूर करण्यात आला. याकरिता कंपनीस 605 रुपये प्रति चौ मी प्रमाणे दर आकारण्यात आला त्यानुसार कंपनीने एम आय डी सी कडे एकूण 152899300 रुपये प्रीमियम भरला.. विशेष म्हणजे कंपनी कडे केवळ 7.50 कोटी रुपये भागभांडवल असताना 15 कोटी पेक्षा अधिक रक्कम कंपनीने एम् आय डी सी कडे भरली. कंपनीने प्राधान्य या सदराखाली हा भूखंड मिळवला. पण याच सदराखाली 2019 सालापासून भूखंड मागणीचे एकूण 16 प्रस्ताव प्रलंबित होते.

कंपनीला एम आय डी सी ने भूखंडाचा ताबा 22 जुलै 2021 रोजी दिला. कंपनीने दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी पंढरपूर अर्बन को ऑप बँकेकडे कर्ज मागणी साठी अर्ज केला व दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी बँकेने 4 कोटी रुपयांचे कर्ज कंपनीस देऊ केले. तसेच कंपनीने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे देखील दिनांक 5 ऑक्टोबर 2021 रोजी कर्ज मागणी केली व 27 ऑक्टोबर 2021 रोजी बँकेने त्यांना 61 कोटी रुपयांचे कर्ज देऊ केले. त्यांनतर पुन्हा कंपनीने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दिनांक 25 जुलै 2022 रोजी 55 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. दोन्ही बँकेने मिळून कंपनीस एकूण 120 कोटी रुपये कर्ज दिलेले आहे.

16 जणांचे भूखंड मागणीचे प्रस्ताव एम आय डी सी कडे 2 वर्षांपासून प्रलंबित असताना कंपनी स्थापन झाल्यापासून केवळ 22 दिवसांत एम आय डी सी ने मे. देश ऍग्रो प्रा. ली. या कंपनीस भूखंड वाटप केला आहे. तसेच दोन बँकांनी मिळून कंपनीस तत्परतेने 120 कोटी रुपयांचे कर्ज दिलेले आहे. म्हणून या दोन्ही बाबतीत चौकशी केली पाहिजे अशी मागणी गुरुनाथ मगे शहर जिल्हाध्यक्ष भाजपा, लातूर आणि ॳॅड.प्रदिप मोरे शहर उपजिल्हाध्यक्ष भाजपा, लातूर यांनी केली आहे.

Previous Post Next Post