Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

दरोड्यातील आरोपींना अटक... चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिनेसह रोख रक्कम 79 लाख 13 हजार 513 रुपयाचा मुद्देमाल जप्त.

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
दरोड्यातील आरोपींना  अटक... चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिनेसह रोख रक्कम  79 लाख 13 हजार 513 रुपयाचा मुद्देमाल जप्त.
 स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे विवेकानंद चौक यांची दमदार कामगिरी






      लातूर-         याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दि.12/10/2022 रोजीच्या मध्यरात्री पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीतील कातपूर शिवारातील एका व्यावसायिकाच्या घरात अज्ञात आरोपींनी प्रवेश करून त्यांच्याकडील अग्निशस्त्र व चाकूचा धाक दाखवून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण लाख 2 कोटी 98 लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून घेऊन गेले आहे. अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथे गुरनं 589/2022 कलम 395, 397 भारतीय दंड विधान संहिता तसेच कलम 25, 3, 4 शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे दिनांक 12/10/2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
              पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी महत्त्वाच्या सूचना करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे, तर विवेकानंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते. 
         सदरच्या पथकांना मार्गदर्शन व सूचना देऊन दरोड्याचे गुन्हे करण्याच्या सवयीचे असलेल्या व रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्याकरिता वेगवेगळ्या दिशेने वर पथके रवाना करण्यात आले होते. 
        नमूद गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना सदर पथकांनी मोठ्या प्रमाणात गोपनीय बातमीदारांना नेमून त्यांच्याकडून माहिती प्राप्त करून घेत होते. दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कातपूर शिवारातील अग्रवाल यांच्या घरी चोरी मधील संशयित आरोपीहा पांचपीर नगर बाभळगाव रोड, लातूर येथे वास्तव्यास आहे. अशी माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ नमूद ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे किशोर घनगाव यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की, पुणे येथे राहणारा टक्कूसिंग कल्याणी व त्याच्या साथीदारासोबत मिळून घातक हत्यारांचा धाक दाखवून सदरची चोरी केल्याचे कबूल केले. त्यावरून नमूद पथकांनी पुणे येथून व विविध ठिकाणाहून खालील नमूद आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम 50 लाख रुपये व सोन्या-चांदीचे दागिने असा जवळपास 29 लाख रुपयांचे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून उर्वरित आरोपींचा व मुद्देमालांचा शोध घेण्यात येत असून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार आहे.
गुन्हण्यातील आरोपी नावे

1) टक्कूसिंग अजित सिंग कल्याणी, वय 50, वर्ष रामटेकडी पुणे.

2) किशोर नारायण घनगाव, वय 38 वर्ष, राहणार पांचपीर नगर, बाभळगाव रोड, लातूर.

3) बल्लूसिंग अमरसिंग टाक, वय 30 वर्ष ,राहणार तीर्थपुरी तालुका घनसांगवी जिल्हा जालना.

4) गणेश कोंडीबा अहिरे, वय 30 वर्ष, राहणार बावची तालुका रेणापूर.

           अशांना वेगवेगळ्या ठिकाणाहून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस करीत आहेत.
               वरिष्ठांचे मार्गदर्शनात नमूद पथकांनी सदर दरोड्याच्या गुन्ह्याचा अतिशय जलद गतीने व कौशल्य पूर्वक तपास करून अवघ्या 10 दिवसात गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
                सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) श्री.जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर ,पोलीस निरीक्षक (सायबर) अशोक बेले, सहायक पोलीस निरीक्षक राहुल बहुरे, सचिन द्रोणाचार्य, भाऊसाहेब खंदारे, सुरज गायकवाड, सावंत, फिंगरप्रिंटचे माळवदकर पोलिस उपनिरीक्षक महेश गळघट्टे, शैलेश जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र ढगे, पोलीस अमलदार अंगद कोतवाड, राजेंद्र टेकाळे ,राम गवारे, रवी गोंदकर, खुर्रम काझी, रामहरी भोसले, प्रकाश भोसले, नवनाथ हासबे ,यशपाल कांबळे, राजेश कंचे ,माधव बिलापट्टे ,सुधीर कोळसुरे सिद्धेश्वर जाधव, योगेश गायकवाड, रियाज सौदागर,राजू मस्के,तुराब पठाण, जमीर शेख,नितीन कटारे ,प्रदीप चोपणे ,नकुल पाटील, युसुफ शेख ,बेल्हाळे, गोविंद भोसले, विनोद चालवाड, मुन्ना पठाण ,अर्जुन राजपूत , गोविंद चामे, युवराज गिरी, महेश पारडे, दीनानाथ देवकते, संतोष खांडेकर, संतोष देवडे ,प्रदीप स्वामी, गणेश साठे, शैलेश सुडे,अंजली गायकवाड यांनी केली आहे.
Previous Post Next Post