लातूरकर रेल्वेच्या प्रश्नांवर आंदोलनाच्या भुमीकेवर
लातूर :लातूरकरांनी अत्तापर्यंत पाणी,नळाला लागणारे मिटर,रेल्वे अशा विविध विषयांवर आंदोलने केली आहेत.त्यामध्ये रेल्वेचे आंदोलन लातूरकरांनी जवळून पाहिले आहे.पु़न्हा एकदा लातूरकरांच्या रेल्वे प्रश्नांवर आणि रेल्वेच्या संदर्भाने सरकारकडून लातूरकरांवर होत असलेल्या अन्यायावर लातूर रेल्वे संघर्ष समितीने पुढाकार घेतला आहे.यावर विचारविनिमय करुन आंदोलनाची दिशा ठरविण्याकरिता बुधवार दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वा. एमआयडीसी कॉर्नरजवळील रेसिडेन्सी क्लब येथे व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लातूर रेल्वे संघर्ष समितीने केले आहे.
लातूरच्या बंद झालेल्या रेल्वे पूर्ववत सुरू करणे, लातूर-मुंबई पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी २४ बोगींची रेल्वे सुरू करावी, लातूर- पुणे मंजूर इंटरसिटी चालू करावी,
नांदेड-पनवेल गाडीच्या बोगी पूर्ववत २१ कराव्यात. कुर्ला-नांदेड, कुर्ला बीदर गाड्या पुन्हा सुरू कराव्यात, अमरावती-पुणे, हैदराबाद-पुणे दररोज लातूरमार्गे सुरू करावी, नांदेड हुबळी, धनबाद-कोल्हापूर पूर्ववत लातूर-उस्मानाबाद मार्गे सुरू करावी, नागपूर-गोवा आणि औरंगाबाद-गोवा लातूरमार्गे सोडावी, लातूर-यशवंतपूर गाडी नियमित करावी, तिरुपती व चेन्नई गाड्या लातूरमार्गे सुरू कराव्यात. हैदराबाद- जयपूर लातूरमार्गे चालवावी. तसेच लातूरच्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवानांसाठी थेट जम्मू-काश्मीर व पूर्वांचल राज्यांना जोडणारी रेल्वेसेवा लातुरातून सुरू करावी, या मागण्यांवर
या बैठकीत विचार केला जाणार आहे. मध्यरेल्वे दरवर्षी कोकण व उत्तरप्रदेशात शेक गाड्या सोडते. मराठवाड्यात मात्र ऐन दिवाळीत आहेत त्या गाड्या बंद केल्या जात आहेत. ज्या चालू आहेत त्याच्या बोगी कमी केल्या जात आहेत. पुणे-मुंबईला लतूर परिसरातून मोठ्या प्रमाणात प्रवासी आहेत. दररोज ३०० ते ५०० प्रवाशांची प्रतिक्षा यादी असते. तरीसुद्धा खीन गाडी सोडली जात नाही किंवा आहेत, त्या गाड्यांन बोगी वाढविल्या जात नाहीत. या सर्व अन्यायांवर विचारविनीमय करुन आंदोलनाची दिशा ठरविण्याकरिता बुवारी लातूरकरांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवाजी नरहरे, अॅड. शेखर हविले, एस. आर. उलके, शिवाजीराव जाधव, डॉ. बी. आर. पाटील, डॉ. भास्कर बोगावकर, समीर पडवळ, एन. व्ही. पाटील, अॅड. सुधाका अडसुळे, सतीश तांदळे, सुनंदा जगताप, अॅड. संतोष ल्डा यांनी केले आहे.