'मशाल' चिन्हाचे पुजन करुन शिवसेने साजरा केला जल्लोश
लातूर-दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करून 'मशाल'हे चिन्ह तर 'शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे' हे पक्षाचे नाव मान्य केल असल्यामुळे आज लातूर शहरांमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली 'मशाल' या चिन्हाचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख विष्णू साबदे, माजी जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, शहर प्रमुख रमेश माळी, किसन समुद्रे, एस आर चव्हाण साहेब, सुनील बसपुरे, शिवराज आप्पा मुळगावकर, युवराज वंजारे ,आनंद जगताप ,माधव कलमुकले, भास्कर माने ,प्रीती ताई कोळी ,स्नेहल कोळी, हिरालाल साबळे, राहुल आप्पा रोडे ,राजाभाऊ लाटे ,श्रीमान कुलकर्णी, संभाजी माळी, गणेश माळी ,शिवानंद कोळी, सुनील मोदी तसेच शिवसेनेचे संलग्न संघटनेचे सर्व पदाधिकारी महिला उपस्थित होते.