Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

उदगीरजवळील बस व कार अपघातप्रकरणी मयत कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

उदगीरजवळील बस व कार अपघातप्रकरणी मयत कारचालकाविरुद्ध  गुन्हा दाखल





उदगीर / प्रतिनिधी/संगम पटवारी

मंगळवारी (दि. ४) सकाळी साडेआठ ते पावणेनऊ वाजताच्या सुमारास उदगीर जवळील हैबतपुर की ते लोहारा दरम्यान एसटी बस व स्विफ्ट डिझायर कारचा समोरासमोर भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाले होते. याप्रकरणी बसचालकाच्या फिर्यादीवरून मयत कारचालकाविरुद्ध उदगीर जि. ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उदगीर शहरातील एका खाजगी रुग्णालयात कामास असलेले सहा जण तुळजापूरचे देवदर्शन करून स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम. एच. २४ ए. बी. ०४०८ मध्ये उदगीरकडे परत येत होते. मंगळवारी (दि. ४) सकाळी साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास उदगीर जवळील लोहारा ते हैबतपुर पाटीच्या दरम्यान उदगीरहून चाकूरकडे निघालेली एसटी महामंडळाची बस क्रमांक ए40210/07499266१३७५

यांच्यात समोरासमोर जोरदार भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा होऊन रस्त्याच्या कडेला खड्डयात जाऊन पडली. कारचा वरील पूर्ण टप अपघातात निघून गेला होता. तर बसच्या उजव्या बाजूचा पत्रा फाटून रस्त्यावर अस्ताव्यस्त पडला होता. या भीषण अपघातात कारमधील मयत अलोक तानाजी खेडकर वय २५ वर्षे, रा. संत कबीरनगर उदगीर), अमोल जीवनराव देवकते ( वय २३ वर्षे, रा. रावणकोळा ता. मुखेड ), कार • चालक नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार ( वय २७ वर्षे, रा. बीदर रोड उदगीर ), कोमल व्यंकटराव कोदरे ( वय २१ वर्षे, रा. डोरनाळी ता. मुखेड. ), यशोमती जयवंत देशमुख ( वय २२ वर्षे, रा. यवतमाळ) या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर कार मधील प्रियंका गजानन बनसोडे ( वय २१ वर्षे, रा. येरोळ) ही गंभीर जखमी असून लातूर येथील शासकीय रुग्णालयात

उपचार सुरु आहेत...

याप्रकरणी बसचालक बाळासाहेब किशनराव फड यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कारचालक मयत नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार हा त्याच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम. एच. २४ ए. बी. ०४०८ हायगाईने व निष्काळजीपणे (ना भरधाव वेगात चालवून फिर्यादी चालवत असलेल्या एसटी बसला ड्रायव्हर बाजूने समोरून जोराची धडक देऊन कारमधील चार सहप्रवाशी यांच्या व स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. तसेच बसमधील अनेक प्रवाशांना किरकोळ जखमी करण्यास कारणीभूत ठरला अशी फिर्याद दिली आहे. त्यावरून मयत कारचालकाविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिसात गु. र. नं. ४५३ / २२ कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ भादंवी आणि सह कलम १८४ मो. वा. कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
Previous Post Next Post