Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

'बीसी'च्या बातशहा वर दरोडा..कोयते आणि पिस्टलचा धाक दाखवीत तब्बल २करोड,२००तोळे सोने लंपास

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

'बीसी'च्या बातशहा वर दरोडा
कोयते आणि पिस्टलचा धाक दाखवीत तब्बल २करोड,२००तोळे सोने लंपास 
 "वेळ आली पण, पैशा पुढे थांबली"

लातूर-लातूर शहरातील मागील काही वर्षापासून 'बीसी'चालक म्हणून त्यांची ओळख असुन बर्याच वेळेस त्यांचा पोलिस स्टेशनशी जवळीक संबंध आला आहे.मागील काही वर्षा खाली 'बीसी'वाद एवढा टोकाला गेला होता की,तो वाद पोलिस स्टेशन पर्यंत पोहचला होता.यासोबतच ते जमीन खरेदी विक्री व्यवहार ही ते पाहत असल्याची जोरदार चर्चा परिसरात होवू लागली आहे. अशा या नामवंत 'बीसी'चालक तथा प्रसिद्ध उद्योगपती राजकमल अग्रवाल यांच्या घरावर पाच दरोडेखोरांनी तलवारी, कोयते आणि पिस्टलचा धाक दाखवीत बुधवारी (दि. १२) पहाटे ३ वाजेच्या सुमारास दरोडा टाकल्याने लातूर शहरात एकच खळबळ उडाली आहे . विशेष म्हणजे दरोडेखोरांनी अत्यंत थंड डोक्याने पूर्वनियोजित दरोडा टाकून घरातील तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि २४४ तोळे सान्याचे दागिने, असा जवळपास ३ कोटी रुपयांचा ऐवज चोरून नेल्याने "वेळ आली पण, पैशा पुढे थांबली"असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

२००१च्या सुमारास गंगाभीषण बाहेती यांच्या बंगल्यावर आशाच प्रकारचा दरोडा टाकण्यात आला होता,त्यावेळेस मात्र खुन, बलात्कार करुन दरोडेखोरांनी गुप्त तिजोरितून लाखोंचा रोकड घेवून दरोडेखोर प्रसार झाले होते,त्यानंतर तब्बल २०वर्षानंतर पुन्हा एकदा अशाच प्रकारचा दरोडा राजकमल अग्रवाल यांच्या घरावर पाच दरोडेखोरांनी तलवारी, कोयते आणि पिस्टलचा धाक दाखवीत बुधवारी (दि. १२) पहाटे ३ वाजेच्या सुमारास दरोडा टाकल्याने हा सर्वात मोठा दरोडा, अशी या घटनेची नोंद झाली आहे.विशेष म्हणजे त्यावेळेसही करोड़ो रुपयाचे घरे बाधून संरक्षणासाठी घरावर एक छदामही खर्च झाला नव्हता आणि आताही या बंगल्यावर संरक्षणासाठी कसलीही सुविधा नव्हती साधे सीसीटीवी कैमरे सुध्दा निट चालत नसल्याचे समोर आले आहे.

 यासंदर्भात शहर पोलीस उपाधीक्षक जितेंद्र जगदाळे यांनी दिलेली माहिती अशी की, कातपूर रोडवरील 'कन्हैयानगरी' या परिसरात अनेक व्यापारी, उद्योगपती यांचे आलिशान बंगले आहेत. याच परिसरात सर्वात शेवटी शहरातील उद्योजक राजकमल अग्रवाल यांचा बंगला आहे. बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास बंगल्याच्या दक्षिणेकडील बाजूला असलेल्या किचनच्या दरवाज्याने पाच दरोडेखोर त्यांच्या बंगल्यात घुसले. यावेळी राजकमल अग्रवाल पती-पत्नी खालच्या मजल्यावर, तर त्यांचा मुलगा आकाश अग्रवाल आणि सुन दोन मुलांसह वरच्या मजल्यावरील खोलीत झोपले होते. दरोडेखोरांनी पहिल्यांदा खालच्या मजल्यावरील राजकमल अग्रवाल यांना झोपेतून उठवले आणि घरातील सोने, पैसे काढून देण्यास सांगितले. २५ ते ३० वयोगटातील या पाचही दरोडेखोरांच्या तोंडाला काळे रुमाल बांधलेले होते. यातील एक दरोडेखोर हा मुख्य दरवाज्यावर थांबला, तर अन्य चौघे घरातील बेडरुममध्ये घुसले. या दरोडेखोरांनी अत्यंत सभ्य भाषेत, कुठलीही शिवीगाळ व मारहाण न करता त्यांना ऐवज काढून देण्यास सांगितला. त्यांच्या हातात तलवारी, धारदार कोयते, चाकू आणि पिस्टल होती. त्यामुळे अग्रवाल यांनी स्वतः घरातील २ कोटी २५ लाख रुपयांची रोख रक्कम २४४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा जवळपास ४ कोटींचा ऐवज दरोडेखोरांच्या हवाली केला. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील महिलांना उद्देशून 'ताई आम्ही तुम्हाला काहीही करणार नाही' असे सांगत घरातील दोन लहान मुले घाबरू नयेत म्हणून त्यांच्या नातवांच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यानंतर दरोडेखोरांनी 'तुमचा मुलगा कोठे आहे' असे विचारले. मुलगा वरच्या मजल्यावर झोपलेला आहे सांगताच त्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन त्याला उठवले. तुमच्या मुलाला मारण्याची सुपारी आहे; परंतु आम्ही मारणार नाही, असे सांगत मुलाच्या गळ्यातील सोन्याचे लकिट काढून देण्यास सांगितले, परंतु, लॉकेट देवाचे आहे असे सांगताच, दरोडेखोरांनी हे लॉकेट घेतले नाही. त्यानंतर घरातून लुटलेला माल त्यांच्याच एका सुटकेसमध्ये भरला आणि पाचपैकी तीन दरोडेखोर हा माल घेऊन निघून गेले. घरातील उर्वरित दोन दरोडेखोरांनी त्यांना सांगितले की, 'आम्ही ६ वाजेपर्यंत इथेच थांबणार आहोत. त्यामुळे आरडाओरड करायचा नाही, पोलिसाना बोलावयाचे नाही असे सांगत त्यांना एका खोलीत बसवले. साधारण १५ ते २० मिनिटांच्या अंतराने उर्वरित दोन्ही दरोडेखोरांनी पलायन केले. दरोडेखोर घरातून गेल्याचा अंदाज येताच साधरण ४ वाजेच्या सुमारास अग्रवाल कुटुंबीयांनी विवेकानंद चौक पोलीस ठाणे गाठले आणि घडलेली हकीकत सांगितली त्यानंतर तातडीने अग्रवाल यांच्या घराकडे पोलीस रवाना झाले. परंतु, तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. या संदर्भात आकाश अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, शहर पोलीस उपाधीक्षक जितेंद्र जगदाळे, विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश गलगट्टे, सहायक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे आदींनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.
Previous Post Next Post