लातूरकरांच्या रेल्वे प्रश्नी डझनभर मागणी असताना, निजाम शेख यांनी एकाच प्रकारची मागणी करुन आगीत तेल ओतले..
-सर्वत्र नाराजगीचा सुर
लातूर :लातूरकरांनी अत्तापर्यंत पाणी,नळाला लागणारे मिटर,रेल्वे अशा विविध विषयांवर आंदोलने केली आहेत.त्यामध्ये रेल्वेचे आंदोलन लातूरकरांनी जवळून पाहिले आहे.पु़न्हा एकदा लातूरकरांच्या रेल्वे प्रश्नांवर आणि रेल्वेच्या संदर्भाने सरकारकडून लातूरकरांवर होत असलेल्या अन्यायावर लातूरकर आंदोलनाच्या भुमिकेवर असून या विषयी लातूर रेल्वे संघर्ष समितीने पुढाकार घेतला आहे.लातूरच्या बंद झालेल्या रेल्वे पूर्ववत सुरू करणे, लातूर-मुंबई पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी २४ बोगींची रेल्वे सुरू करावी, लातूर- पुणे मंजूर इंटरसिटी चालू करावी,अशा विविध विषयांवर लातूरकरांच्या मागण्या असताना रेल्वेच्या महाराष्ट्र,मध्यप्रदेश,कर्नाटक झोनल उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी दीपावलीच्या कालावधीसाठी लातूर ते मुंबई अशी विशेष रेल्वे गाडी सुरू करावी,अशी एकच मागणी महाप्रबंधकांकडे निवेदन करून लातूरकरांवर रेल्वे प्रश्नी होत असलेल्या अन्यायावर आगीत तेल ओतल्यासारखे झाले आहे.सर्वत्र नाराजगीचा सुर उमटू लागला आहे.निजाम शेख हे स्वत: पत्रकार आहेत आणि मागील चार दिवसांपासून या विषयावर आंदोलनासाठी बैठकां होत असून त्याबद्दल खासदारांचेही वरिष्ठांचे बोलने चालू असताना मात्र निजाम शेख यांनी याप्रकारचे निवेदन देवून ते काय साध्य करत आहेत..?लातूरवरून आठरा रेल्वे चालू असून आठ रेल्वे बंद आहेत हे निजाम शेख यांना माहिती नाही का..?माहिता नसेल तर त्यांना रेल्वेच्या महाराष्ट्र,मध्यप्रदेश,कर्नाटक झोनल उपभोक्ता सल्लागार समितीवर राहण्याचा अधिकार नाही..?अशी ओरड लातूर जिल्ह्यांतून होवू लागली आहे.
लातूर स्टेशन वरून दररोज 4हजार प्रवाशी तिकीट घेवून प्रवास करतात चालु असलेल्या गाड्या सुरु झाल्या पाहिजेत त्यावर निजाम शेख गप्प आहेत , नवीन रेल्वे दानवे साहेब रेल्वे मंत्री असून त्यांना एक गाडी चालु करता आली नाही त्यांनी औरंगाबाद वरून मुंबई ला जाणारी जलन्या पर्यंत गाडी पळवली, लातूर मार्गे जाणारी धनबाद जलना मार्गे पळवली, लातूर चा प्लॅटफॉर्म 750मीटर चा आहे 5 वर्षा पासून 17बोगी च आहेत. रेल्वे 24/26बोगि ची शमता आहे लातूर वरून 26बोगि लागू शकतात हे निजाम शेख यांना माहित नाही का..? सद्या टि सी ची कमाई लाखावर असल्याचेही आता लपून राहिले नाही त्यांची दलाली करणाऱ्या ना आता समितीवर असणार्यांनी उघडे करण्याचे अवश्यकता असताना मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.गरीबाचे हाल होत आहेत अशी तिव्र भावना लातूरच्या जनतेकडून व्यक्त होत आहेत.
निजाम शेख यांनी दिलेले निवेदन
सध्या दीपावलीचा कालावधी असून रेल्वेला प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे.लातूर-मुंबई या गाडीचे वेटिंग तिकीट मिळणेही कठीण झाले आहे.त्यामुळे दीपावलीच्या कालावधीसाठी लातूर ते मुंबई अशी विशेष रेल्वे गाडी सुरू करावी,अशी मागणी रेल्वेच्या महाराष्ट्र,मध्यप्रदेश,कर्नाटक झोनल उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी महाप्रबंधकांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात केली आहे.
महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांना दिलेल्या निवेदनात निजाम शेख यांनी म्हटले आहे की,लातूरहून मुंबईला जाण्यासाठी एकच गाडी आहे. त्यातही ही गाडी तीन दिवस बिदर आणि चार दिवस लातूरहून सुटते. मुंबईतील विविध कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.त्यामुळे या गाडीला रोजच गर्दी असते.सध्या दीपावलीचा कालावधी असल्यामुळे ही गर्दी वाढली आहे. रेल्वे तिकिटाचे आरक्षण मिळत नाही.वेटिंगचे तिकीटसुद्धा मिळणे कठीण झाले आहे.त्यामुळे प्रवाशांना इतर वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.याचा गैरफायदा घेत खाजगी बस चालकांकडून अधिक तिकीट दर आकारला जात आहे.यामुळे ग्राहकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
दीपावलीच्या कालावधीसाठी लातूर ते मुंबई अशी विशेष रेल्वे गाडी सोडली तर त्यातून रेल्वे प्रशासनाचा आर्थिक लाभ होऊ शकतो,असे निजाम शेख यांनी म्हटले आहे.
मुंबईला जाण्यासाठी एकच गाडी असल्याने साहजिकच विविध जिल्ह्यातील मंत्री,
आमदार,लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाचे व्यक्ती याच गाडीने प्रवास करतात.त्यांना आरक्षित ठेवलेल्या जागा उपलब्ध होतात परंतु त्यामुळे इतर प्रवाशांना वातानुकूलित कक्षाचे तिकीट मिळू शकत नाही.त्यामुळे २२१४४ व २२१०८ या गाड्यांना दोन वातानुकूलित डबे वाढवावेत. दोन स्लीपर कोचही वाढवावेत, अशी मागणी निजाम शेख यांनी या निवेदनात केली आहे.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनाही या निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
लातूकरांच्या रेल्वे विषयी मागण्या
लातूरच्या बंद झालेल्या रेल्वे पूर्ववत सुरू करणे, लातूर-मुंबई पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी २४ बोगींची रेल्वे सुरू करावी, लातूर- पुणे मंजूर इंटरसिटी चालू करावी,
नांदेड-पनवेल गाडीच्या बोगी पूर्ववत २१ कराव्यात. कुर्ला-नांदेड, कुर्ला बीदर गाड्या पुन्हा सुरू कराव्यात, अमरावती-पुणे, हैदराबाद-पुणे दररोज लातूरमार्गे सुरू करावी, नांदेड हुबळी, धनबाद-कोल्हापूर पूर्ववत लातूर-उस्मानाबाद मार्गे सुरू करावी, नागपूर-गोवा आणि औरंगाबाद-गोवा लातूरमार्गे सोडावी, लातूर-यशवंतपूर गाडी नियमित करावी, तिरुपती व चेन्नई गाड्या लातूरमार्गे सुरू कराव्यात. हैदराबाद- जयपूर लातूरमार्गे चालवावी. तसेच लातूरच्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवानांसाठी थेट जम्मू-काश्मीर व पूर्वांचल राज्यांना जोडणारी रेल्वेसेवा लातुरातून सुरू करावी, या मागण्यांवर
या बैठकीत विचार केला जाणार आहे. मध्यरेल्वे दरवर्षी कोकण व उत्तरप्रदेशात शेक गाड्या सोडते. मराठवाड्यात मात्र ऐन दिवाळीत आहेत त्या गाड्या बंद केल्या जात आहेत. ज्या चालू आहेत त्याच्या बोगी कमी केल्या जात आहेत. पुणे-मुंबईला लातूर परिसरातून मोठ्या प्रमाणात प्रवासी आहेत. दररोज ३०० ते ५०० प्रवाशांची प्रतिक्षा यादी असते. तरीसुद्धा गाडी सोडली जात नाही किंवा आहेत, त्या गाड्यांन बोगी वाढविल्या जात नाहीत.