स्वत:चे 'समाधान' करणार्या अधिकार्याची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली झाडाझडती
रविवारी पोहचले "सी " झोनच्या ऑफिसमध्ये
लातूर दि.16 (प्रतिनिधि) :- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. रविवारी सकाळी लातूर महानगरपालिकेच्या "सी" झोन कार्यालयात गेले.. नियोजित जन सुनावणी होती....त्याठिकाणी अक्षरश:नागरिकांनी तक्रारीचा पाढाच वाचला. नाल्या, रस्ते, नागरिकांसाठी शौचालय देणे, वाढीव पाणी कर, विद्युत सुविधा, हे सगळे ऐकून घेऊन... उपस्थित महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय सी. झोन चे अधिकारी समाधान सुर्य़वंशी यांची खरडपट्टी केली व या नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या सुचना महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आल्या.
"यावरून 'नायक'सिनेमा ची आठवण लातूरकरांना झाली.फक्त हे वास्तव असल्यामुळे राजीनामा घेण्यात आला नाही .स्वत:चे 'समाधान' करणार्या अधिकार्याची झाडाझडती घेतल्यामुळे जिल्हाधिकारी यांची चर्चा संपुर्ण लातूर शहरामध्ये होवू लागली आहे .
ऐन दिवाळीत जिल्हाधिकारी तथा लातूर महानगर पालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी जनसुनावणी घेण्याचे ठरवल्यामुळे
आता या कामचुकार आणि स्वत:चे 'समाधान' करणार्या अधिकार्याला नागरिकांच्या कामाचे समाधान करावे लागणार आहे.वेळकाढूपणा करणार्या या अधिकार्याला मात्रा आता दिवाळी कडू जाणार असल्याचे नागरिकांतून बोलले जावू लागले आहे."
जिल्हाधिकारी यांच्याकडे लातूर महानगर पालिकेचे आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार असुन नागरिकांच्या प्रभागातील समस्या तक्रारी जाणून घेण्यासाठी व निवारणासाठी जनसुनावणी लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय सी. झोन येथे भरविण्यात आली होती. यावेळी मनपा उपायुक्त मयुरा सिंदीकगर, शहर अभियंता नवनाथ केंद्र, क्षेत्रिय अधिकारी समाधान सुर्यवंशी , स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे, शाखा अभियंता पी. सी. घंटे, विद्यत विभाग प्रमुख श्री. ताकपिरे, महिला बाल विकास अधिकारी रुक्मानंद वडगावे, संबंधित विभागाचे अधिकारी आदि त्या त्या भागातील नागरिक, प्रतिनिधी, महिला उपस्थिती होते.
यात प्रभाग क्र. 3,4,5,6 मधील नागरिकांनी त्यांच्या समस्या जसे की, रस्ते, नाली, जुन्या पाण्याच्या बोअरवरील टाक्या काढण्यासाठी, कबाले वाटप तक्रारी कचरा व्यवस्थापन, ओला आणि सुका कचरा यासंबंधी या जनसुनावणीत विविध एकूण 16 निवेदने प्राप्त झाली. क्षेत्रिय कार्यालयातंर्गत असलेल्या कंपोस्ट पिट व एम. आर.एफ. सेंटरबाबतच्या तक्रारी आदि नागरिकांच्या तक्रारीवर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा लातूर महानगर पालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले.
तसेच कचरा वेगळा करण्याची ही जबाबदारी नागरिकांची आहे. कचरा घरात साठवताना तो ओला आणि सुका कचरा वेगळा करावा. ज्या ठिकाणी डासांचे प्रमाण वाढत आहे त्या ठिकाणी फवारणी महानगरपालिकेने करण्याबाबतही सांगितले. नागरिकांच्या समस्या लक्षात घेवून त्यावर निर्णय घेण्यात यावा. स्ट्रीट लाईटचे काम टप्याटप्याने करण्यात येईल जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले.