Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मराठवाडा विकास परिषदेचे कार्य सर्वांगीण विकासासाठी..!

मराठवाडा विकास परिषदेचे कार्य सर्वांगीण विकासासाठी..!
--माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे.



       अहमदपूर दि.16 (प्रतिनिधी): मराठवाडा विकास परिषद ही मागील अनेक वर्षापासून विविध समस्यासाठी, विविध प्रश्नावर लढा देत आली असून मराठवाडा विकास परिषदेचे कार्य सर्वांगीण विकासासाठीअसे प्रतिपादन माजी खासदार डॉ व्यंकटेश काब्दे यांनी केले.
            याबाबत सविस्तर वृत्त असे की,दि. 16 ऑक्टोबर शासकीय विश्रामगृह येथे मराठवाडा विकास परिषदेच्या आयोजित विशेष बैठकीत अध्यक्ष समारोप करताना डॉ. काब्दे बोलत होते. 
      यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड,शिवानंद हिंगणे,कार्यकारणी सदस्य प्रा.विकास सुकाळे,मराठवाडा जनता विकास परिषदेचे सचिव डॉ.सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी,उप प्राचार्य गिरीधर घोरबांड, प्रा.मारोती बुद्रुक पाटील, उमाकांत नरडेले , दिलीप गुळवे सर,रमाकांत कोंडलवाडे आदींची उपस्थिती होती. 
            पुढे बोलताना डॉ काब्दे म्हणाले की, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाडा विकास परिषद गेल्या अनेक वर्षापासून अनेक प्रश्न ऐरणीवर घेऊन लढा उभारत आहे अनेक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी परिषदेचे कार्य तत्पर आहे. मराठवाड्यातील रेल्वेचा प्रश्न असो,शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असो अशा अनेकविध प्रश्नांवर मराठवाड्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहे.मात्र मराठवाड्याच्या विकासासाठी राज्यकर्त्याचे व प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. मराठवाड्यातील अनेक उद्योग पळवण्यात आले.मराठवाड्यामध्ये अनेक असे प्रश्न प्रलंबित आहेत.त्यामुळे मराठवाड्याचा विकास खुंटला आहे.नांदेड ते लातूर रोड व्हाया लोहा अहमदपूर चाकूर मार्गे रेल्वे प्रलंबित मार्ग सुरू झाला तर मराठवाड्याचा विकास होण्याच्या अनुषंगाने मदत होईल यासाठी आपण स्थानिक पातळीपासून ते उच्च पातळीपर्यंत पाठपुरावा करून कार्य करू असेही ते शेवटी म्हणाले.
     यावेळी बोलताना मराठवाडा विकास परिषदेचे सचिव युवा नेते डॉ. सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी म्हणाले की, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे मराठवाडा जनता विकास परिषद ही एकमेव संस्था असून या संस्थेला सर्वच समाज घटकांनी मदत करणे गरजेचे आहे. या परिसरातील समन्यायी विकास होण्याच्या अनुषंगाने मराठवाडा जनता परिषद ही प्रत्येक मार्गाने पुढाकार घेणार असून प्रसंगी जनतेच्या प्रश्नासाठी शासनाला जागे करण्यासाठी आंदोलनाची सुद्धा भूमिका घ्यायला मागेपुढे पाहणार नाही. या भागाचा विकास झाला पाहिजे हेच संस्थेचे अंतिम ध्येय असून विकासाची भूक असणाऱ्या प्रत्येकाने या कामासाठी मदत करावी अशी विनंती परिषदेचे तालुका सचिव डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक पर भाषणात व्यक्त केले. 


यावेळी प्राचार्य वाघंबर गंपले, डॉक्टर पांडुरंग चिलगर प्रा. सय्यद मुज्जमिल प्रा.सुरेंद्र येलमटे,प्रा श्रीशैले मलाशेटे,शरद करकनाळे, मुख्याध्यापक मधुकर मदने ,विलास चापोलीकर,गौरव चवंडा, लक्ष्मण फड,गुरूप्पा बावगे,संदिप प्रा दिलीप भालेराव ,नंतकुमार चोचांडे,विश्वरूप धाराशिवे,दिपक हेंगणे, संतोष कदम शिवाजी सुर्यवंशी,मनोहर ढेले,राजेश निलेवाड आदींची उपस्थिती होती
Previous Post Next Post