'तृप्ती देसाईं' च्या तालावर नाचली तरुणाई
राधिका ट्रॅव्हल्स प्रस्तुत 'युवा' दांडीयास अभुतपूर्व प्रतिसाद
लातूर शहरामध्ये अनेक ठिकाणी गरबा, दांडियाचे आयोजन करण्यात आले होते परंतू राधिका ट्रॅव्हल्स प्रस्तुत 'युवा' दांडीयांमध्ये बिग बॉस सीजन ३चे तृप्ती देसाई येणार हे कळाल्यानंतर तरुण वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.आणि तब्बल दोन ते तिन हजार लातूरकरांनी मुला मुलींसह शनिवार दि.१आक्टोंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता दिवाणजी मंगल कर्यालयत एकच गर्दी केली होती.
सायंकाळी आठ च्या सुमारास राधिका ट्रॅव्हल्स प्रस्तुत 'युवा' दांडीयाची मुख्य आकर्षण म्हणजे बिग बॉस सीजन ३चे तृप्ती देसाई,यांचे आगमन झाले त्यांचे स्वागत सतत सामाजिक कार्यात अग्रसेर असलेले राधिका ट्रॅव्हल्स चे संचालक जुगोलकिशोर तोष्णिवाल यांनी केले.त्यांच्या सोबत राधिका डेव्हलपर्स चे बिल्डर मुख्य आयोजक श्री श्याम तोष्णिवाल , अतिरिक्त पोलिस अधिक्षक अनुराग जैन,प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये,लातूर परिवाराचे सतिशजी तांदळे ,फोटो क्राईम न्यूज चे मुख्य संपादक विष्णु आष्टीकर,लातूर मधिल रवि वामनराव जाधव ज्वेलर्स चे प्रतिष्ठित युवा ज्वेलरी उद्योजक केदार जाधव,या दांडीयाचे आयोजक दिपक जाधव,पियुष शास्त्री,अकाश सुर्यवंशी, योगेश ब्रिजवासी,उमेश धर्माधीकारी,यश अग्रवाल,प्रेमांशी जाॅयशर हे होते
यांनी आई तुळजाभवाणीच्या प्रतिमेस हार घालून दांडीची सुरुवात करण्यात आली.
दांडीयाची सुरूवात होताच तरूण मुला मुलींसह वरिष्ठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले .एकसे एक गाण्यांवर तरुणाई बेधुंदपणे नाचत होती दांडीयाच्या पारंपारिक ड्रेस मुळे मुलमुली ते आजुन सुंदर दिसत होते.
त्यामुळे दांडीयाची मुख्य आकर्षण म्हणजे बिग बॉस सीजन ३चे तृप्ती देसाई यांनाही मोह आवरला नाही आणि त्यांनीही या अभुतपूर्व दांडीयाचा आनंद घेत नाचण्यास सुरुवात केली त्यांच्यासोबत मुख्य आयोजक श्री श्याम तोष्णिवाल हे ही असल्यामुळे तरुणाई बेधुंदपणे नाचत होती.एकसे एक डिजे च्या तालावर हजारो तरुण मुलामुलींनी या दांडीयाचा आनंद घेतला.रात्री दहाच्या सुमारास दांडीयाची सांगता झाल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करण्यात आला यामध्ये प्रथम,द्वितीय,तृतिय,मुला मुलींना आणि कपल्स ना तृप्ती देसाई व आयोजकांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
"आपण नवरात्रि निमित्त आई तुळजाभवाणीची पुजा करतो त्यामुळे आपल्या आजुबाजुस असलेल्या माता भगीनींचा मान सम्मान करावा.मी खुप दांडीया बघीतले परंतू लातूरकरांचा एवढा उत्साहात दांडीया असतो हे मला अत्ता कळाले,मला ईथे बोलवल्याबद्दल माझ्या लातूरकरांना व आयोजकांना खुप खुप शुभेच्छा"
या दांडीयाचे आयोजन दिपक जाधव,पियुष शास्त्री,अकाश सुर्यवंशी, योगेश ब्रिजवासी,उमेश धर्माधीकारी,यश अग्रवाल,प्रेमांशी जाॅयशर,यांनी केले असुन हे त्यांचे असुन पुढील वर्षी या पेक्षाही अतिशय सुंदर असे नियोजन करणार असल्याचे आयोजकांनी सांगीतले आहे.