'आयुक्तांच्या' बदली मुळे काही नगरसेवकांमध्ये हलचल..
लातूर-काही दिवसांपुर्वी महाराष्ट्रातील सर्व आय ए एस अधिकार्यांच्या बदल्याला झाल्या त्यामध्ये लातूर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांची जळगाव येथे बदली झाली.हे कळताच काही नगरसेवकांमध्ये हलचल चालू झाली ती म्हणजे अर्ध़वट राहिलेल्या फाईली संदर्भात असल्याची जोरदार चर्चा महानगरपालिकेच्या आवारात होवू लागली आहे.नेमके या फाईल्सचे देवानघेवान आधिच झाल्यामुळे त्या नगरसेवकांची झोप उडाल्याचे उघड बोलले जावू लागले आहे.आता माननिय जिल्हाधिकारी यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपाचा आयुक्त म्हणुन पदभार असुन ,आता जिल्हाधिकारी यांची नजर या फाईल्स वर पडू नये अशी प्रार्थना नगरसेवक करताना दिसत आहेत.काही दिवसासाठी का होईना आयुक्त साहेब पुन्हा वापस लातूरला येतील का..?अशी केवीलवानी अशा त्या नगरसेवकांमध्ये येवू लागली आहे.. तसे झाल्यास त्या नगरसेवकांना 'दिवाळी' गोड जाईल, यात काही शंका नाही