Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या महिला सदस्यांचा नवरात्रीनिमित्ताने सत्कार

  Ads by Eonads
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या महिला सदस्यांचा नवरात्रीनिमित्ताने सत्कार



स्वतः चा घर, व्यवसाय, नौकरी सांभाळून सामाजिक कार्याची आवड म्हणून
गेल्या १२२२ दिवसांपासून लातूर जिल्हा हरित व स्वच्छ करण्यासाठी प्रयत्नरत
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या
प्रा.मिनाक्षी बोंगडे, सुलेखा कारेपुरकर, कल्पना कुलकर्णी , ऍड. वैशाली यादव, प्रिया नाईक, पुजा पाटील, रोहिणी पाटील, आशा अयाचित, निता कानडे, युगा कनामे, वकील गायत्री, विदुला राजमाने मनीषा कोकणे, प्रतीक्षा कल्याणकार, डॉ. विमल डोळे, विमल रेड्डी, श्वेता लोंढे, समृद्धी फड, सिया लड्डा, राजनदिनी लड्डा, डॉ. वैशाली इंगोले, राजपूत मॅडम
या २३ दुर्गांचा नवरात्री निमित्ताने सत्कार करण्यात आला.
लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ, विचारवंत, शिवाई प्रतिष्ठाणच्या डॉ. सुनीता पाटील व डॉ. जयंत पाटील यांच्या शुभ हस्ते शॉल, पुष्पहार, आपट्याचे झाड देऊन हा सत्कार करण्यात आला. यांच्या अविरत प्रयत्नाने लातूर शहराचे रूप पालटले असून आता लातूर शहर हरित शहर म्हणून ओळखले जात आहे.
 यावेळी तेरणा वसाहतच्या ऑकसिजन पार्क मध्ये आपट्याची ची झाडे लावून
विजयादशमी चा उत्सव साजरा करण्यात आले. दसर्यानिमित्ताने आपट्याची पाने न देता आपट्याची झाडे देऊन वृक्ष तोड न करता वृक्ष लागवड करा असा संदेश देण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, इम्रान सय्यद, डॉ. भास्कर बोरगावकर, डॉ. पदमाकर बागल, मिर्झा मोईझ, महेश गेलडा, राहुल माने, दयाराम सुडे, अभिषेक घाडगे, आकाश सावन्त, बाळासाहेब बावणे, दीपक नावाडे, विजय मोहिते, अरविंद फड, खाजा पठाण, असिफ तांबोली, विकास कातपुरे, भगवान जाभाडे, मुकेश लाटे, नागसेन कांबळे, बळीराम दगडे, पांडुरंग बोडके इत्यादी सदस्यांनी परिश्रम घेतले.
ग्रीन लातूर वृक्ष टीम
Previous Post Next Post