Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आरोग्याची काळजी घेण्यासाठी बाह्य रुग्णालयाची उभारणी : आ. बनसोडे

आरोग्याची काळजी घेण्यासाठी बाह्य रुग्णालयाची उभारणी : आ. बनसोडे
उदगिरात बाह्य रुग्ण इमारतीचे भूमिपूजन

उदगीर / प्रतिनिधी


उदगीर व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बाह्य रूग्णालयाची उभारणी करण्यात येत असून आगामी काळात गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम या बाह्य रुग्णालयातील कर्मचारी करतील. त्यासाठी बाह्य रुग्णालयाची इमारत उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी येथील शासकीय सामान्य रुग्णालय परिसरात बाह्य रुग्ण विभाग इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे 
प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर होते. व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेश सचिव राजेश्वर निटुरे, प्रा. शिवाजीराव मुळे, कैलास पाटील, कल्याण पाटील

बाळासाहेब मरलापल्ले, रामराव बिरादार, समीर शेख, इब्राहिम नाना पटेल, शमशोद्दीन जरगर, डॉ. शशिकांत देशपांडे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. शशिकांत डांगे, डॉ.

महिंद्रकर, डॉ. गजेंद्र राठोड, मंजुरखॉ पठाण, प्रवीण भोळे, गजानन सताळकर, प्रा. गोपाळकृष्ण घोडके, सुभाष धनुरे, इमरोज हाशमी, मुन्ना पांचाळ, सोपान ढगे, उपअभियंता एल. डी. देवकर, भाग्यश्री घाळे, सय्यद जानी, उर्मिला वाघमारे, प्रकाश राठोड, डॉ. विनायकराव पाटील, प्रकाश हैबतपुरे, रणजीत कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात. सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत होतो. ही गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या आमदार फंडातून ११ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. विविध प्राथमिक आरोग्य केंद्रास व शहरातील सामान्य रुग्णालयासह विविध ठिकाणी ११ रुग्णवाहिका देवून कोरोना काळात सर्वसामान्यांची सेवा करता आली असल्याचे सांगितले. प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार यांनी केले. सूत्रसंचालन सर्जेराव भांगे यांनी केले तर ज्ञानेश्वर पाटील यांनी आभार मानले..
Previous Post Next Post