आ.अमित विलासराव देशमुख व आ. धिरज विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी दिवाळी निमित्त संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांना दिल्या शुभेच्छा
लातूर प्रतिनिधी २५ आक्टोंबर २२ :
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांची आज मंगळवार दि. २५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी दिवाळीनिमित्त आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक, यांनी भेट घेतली, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, सर्वांसोबत फराळांचा आस्वादही घेतला.
यावेळी बाभळगाव निवासस्थानी दिवाळी सणाच्या निमित्ताने माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांची प्रा. बी.व्ही. मोतीपवळे, यशवंतराव पाटील, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, दिलीप माने, एन. आर. पाटील, महादेव जटाळ, मंगेश भोसले, बाबा शेख, प्रताप पाटील, मनोज पाटील, व्यंकट शिंदे, मोहन माने, जगदीश बावणे, मधुकर गुंजकर, श्रीकांत सोनवणे, ओमप्रकाश पाटील, रमेश सूर्यवंशी, माधव गंभीरे, फारुक शेख, सीए सुनील कोचेटा, प्रथमेश कोचेटा, प्रा. शिवराज मोटेगावकर, उद्योजक तुकाराम पाटील, संतोष बिराजदार, व्हाईस चेअरमन विजय देशमुख, सुंदर पाटील कव्हेकर, प्रा. प्रवीण कांबळे, व्यंकटेश पुरी, प्रभाकर केंद्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, सदाशिव कदम, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. रवींद्र काळे, गुरुनाथ गवळी, राजेसाहेब सवइ, अशोक काळे, सचिन दाताळ, प्रवीण पाटील, रणजीत पाटील, उटीचे सरपंच भालचंद्र पाटील, नवनाथ काळे, भैरवनाथ सवासे, गोविंद बोराडे, लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, संचालक पृथ्वीराज शिरसाठ, कार्यकारी अधिकारी हनमंत जाधव, अनुप शेळके, राजकुमार पाटील, ज्ञानोबा शेळके, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, संभाजी रेड्डी, हनमंत पवार आदीसह लातूर शहर, तालुका रेणापुर, औसा व इतर ठिकाणाहून आलेले काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, लातूर जिल्ह्यातील जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते, विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे पदाधिकारी, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, व्यापार, उद्योग, क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.