Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

तिर्रट नावाच्या जुगारावर धाड; २२ जणांवर गुन्हा दाखल; ९ जण फरार

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
तिर्रट नावाच्या जुगारावर धाड; 
२२ जणांवर गुन्हा दाखल; ९ जण फरार

रेणापूर / प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील पानगाव शिवारातील एका शेतात पत्र्यांच्या  शेडसमोर तिरंट नावाचा जुगार खेळला जात असल्याच्या माहितीवरून सहायक पोलीस अधिक्षक तथा चाकुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम यांनी गुरुवारी (दि. २७) रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास धाड टाकून ३ लाख ४० हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या २२ जणांविरुद्ध रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून यातील १३ जणांना ताब्यात घेतले आहे तर ९ जण फरार झाले
पानगाव (ता. रेणापूर) शिवरातील रमाकांत लिंबाजी संपते यांच्या शेतातील पत्र्यांच्या शेड समोर व्हरांड्यात, अवैधरित्या पैसे कमावण्याच्या हेतूने तिर्रट नावाचा जुगार खेळाला व खेळविला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन कदम यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कदम यांनी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचाऱ्याच्या पथकासह सदर ठिकाणावर धाड टाकली. यात अवैधरित्या पैसे कमावण्याच्या
हेतूने तिरंट नावाचा जुगार खेळाला व खेळविला जात असल्याचे आढळून आले. पोलासांनी जुगाराचे साहित्य रोख रक्कम मोबाईल व मोटरसायकल असा एकूण ३ लाख ४० हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस नाईक सुर्यकांत बबनराव कलमे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लखन सुरेश बगिले (वय २५), मारुती केरबा कुरे (वय ४१), अक्षय विलास पैदे (वय २५), मंजूर पैगंबर शेख (वय ३६), संदीप ज्ञानोबा गुडे (वय ४१), भैय्या निवृत्ती आचार्य (वय ३८), शेख अन्सार नाजुद्दीन(वय ३५), चंद्रकांत विलास पैदे (वय ३१), सुरज उत्तम हरिदास (वय २२), शिरू मोहम्मद शेख (वय ४७), सुकेश बालाजी गुडे (वय ४१). बसवेश्वर माणिकराव टिपराळे (वय ३७), कोंडीबा महादू हनवते (वय ७६), अविनाश कालवले, रमाकांत संपते, आशिष पेदे, बालाजी हनवते, रशीद शेख, आप्पा व्यवहारे, लालू वांगे, मुन्ना शिरसाठ, जनार्धन वधिले (सर्व रा. पानगाव, ता. रेणापूर) यांच्या विरूद्ध गुरनं, ३४३ / २२ कलम १२ अ. मं. जु. का. नुसार रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पोलिस जमादार ए. के. कांबळे हे करीत आहेत,
Previous Post Next Post