गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
गरिबांच्या तोंडचा 'घास' हैदराबाद ला सप्लाय..
लातूर मध्ये रेशनचा काळाबाजार करणारी टोळी
लातूर-आनंदाचा शिधा लवकरच सर्वांपर्यंत पोहोचेल असा पुर्नउच्चार बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. एका किटमध्ये एक किलोप्रमाणे डाळ, साखर, रवा आणि एक लिटर तेल पिशवी दिली जात आहे. त्यानंतर आनंदाचा शिधा रेशन दुकानांपर्यंत पोहोचवण्याची लगबग सुरु झाली. दिवाळीला काही तास असताना का होईन आनंदाचा शिधा पदरात पडल्याने काही प्रमाणात महिला वर्ग खूश झाला आहे. परंतू या सर्व घाईगडबडीत गरिबांच्या तोंडचा 'घास' रेशनचा माल गहु,तांदुळ हैदराबाद ला सप्लाय होत असल्याची धक्कादायक माहिती चर्चीली जात आहे.विशेष म्हणजे दर महिन्याच्या १०तारखेपासुन काही रेशन दुकानदार गहु,तांदुळ पोत्यामध्ये भरुन मार्केट यार्डा मध्ये काही दुकानांमध्ये गोळा केले जातात तेथुन काळाबाजार करणारी टोळी सोळा टायरी गाडी मध्ये भरून रविवारी रात्री हैद्राबादला लंपास करत असल्याची माहिती समोर येत आहे.विशेष म्हणजे मार्केट यार्डा चे मागील बाजुचे गेट सर्रास उघडे असते किंबहुना उघडे ठेवण्यास या टोळी कडून भाग पाडले जाते.ईतर बाजारापेक्षा हैद्राबादला हा गहु, तांदुळ २५रूपये प्रति किलो प्रमाणे घेतला जात असल्यामुळे अशा काळाबाजार करणार्या टोळीचा ओघ वाढला आहे.त्यामुळे एकीकडे शाशन आनंदाचा शिधा वाटप करत आहे तर दुसरीकडे मात्र ऐन दिवाळीत हा गरिबाचा तोंडचा घास हि टोळी हिरावत असुन यामध्ये काही अधिकारी, कर्मचारी आपले पितळ पांढरे करत आहेत.पुरवठा अधिकारी देशमुख हे मात्र नावालाच असुन कार्यवाही करण्यासाठी ते धजत नाहीत किंबहुना त्यांना ते तसे करायचे नसल्याचे आता उघड चर्चा होवू लागली आहे. अशा या गंभीर विषयावर मा जिल्हाधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून संबंधीतांवर कठोर कार्रवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.